Elec-widget

राहुल गांधी यांचा 'हा' जवळचा मित्रही भाजपच्या वाटेवर?

राहुल गांधी यांचा 'हा' जवळचा मित्रही भाजपच्या वाटेवर?

पंतप्रधान मोदींनीही अतिश मित्रत्वाच्या नात्याने मिलिंद देवरांना उत्तर दिलं. तसच My Friend म्हणूनही त्यांचा उल्लेख केला.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 23 सप्टेंबर : काँग्रसेचे राज्यातले अनेक दिग्गज नेते भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसलाय. आता काँग्रेसला आणखी मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी मिलिंद देवरा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक वाढत असून त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून मोदी आणि देवरा यांनी एकमेकांची स्तुती केल्याने ही चर्चा सुरू झालीय. लोकसभेची निवडणूक हरल्यापासून मिलिंद देवरा यांची भूमिका ही भाजपला समर्थन देणारी दिसून येतेय. 370 कलम असो किंवा कालचे मोदींचे भाषण मिलिंद देवरा भाजपचे समर्थन करत आहेत त्यामुळे ही चर्चा जास्तच गांभीर्याने घेतली जातेय.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणात नाही - पवार

पंतप्रधान मोदींच्या ह्युस्टन इथल्या कार्यक्रमानंतर मिलिंद देवरा यांनी आपले वडील मुरली देवरा यांची आठवण शेअर केली, मोदींनी पण त्याचे कौतुक करत आज मुरली देवरा असते तर त्यांना पण भारत आणि अमेरिकेचे संबंध वृद्धिंगत होताना पाहून आनंद झाला असता असं ट्विट केलं. त्यामुळे मिलिंद देवरा यांचे भाजप प्रेम जास्तच  दिसून येतंय असं बोललं जातंय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षापासून अंतर ठेवून आहेत म्हणून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

'युती'चं अखेर ठरलं, उद्या होणार घोषणा; फडणवीस-ठाकरे शिष्टाई फळाला

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद देवरा यांची काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. मिलिंद देवरा हे राहुल गांधींच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातले सहकारी होते. गांधी घराण्याशी एकनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे. मिलिंद यांचे वडील मुरली देवरा हे राजीव गांधींच्या विश्वासून सहकार्यांपैकी एक होते. मुंबईतून काँग्रेसला आर्थिक रसदपुरवढा करण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं. देशाचे अनेक वर्ष ते पेट्रोलियम मंत्री होते.

Loading...

कर्जतमध्ये राम शिंदेंच्या अडचणी वाढल्या, अजित पवारांनी टाकला डाव

काय म्हणाले देवरा?

अमेरिकेत मोदींचं जे स्वागत झालं त्यामुळे मला माझ्या वडिलांची आठवण झाली झाली. देशाचे पेट्रोलियम मंत्री असताना त्यांनी भारत अमेरिका संबंधांना बळकटी दिली होती. दोन्ही देशांच्या संबंधांचा पाया त्यावेळी घातला गेला होता.

मोदींचं मिलिंद देवरांना उत्तर

पंतप्रधान मोदींनीही अतिश मित्रत्वाच्या नात्याने मिलिंद देवरांना उत्तर दिलं. तसच My Friend म्हणूनही त्यांचा उल्लेख केला. मुरलीभाई असती असते तर त्यांना दोन्ही देशांचे संबंध बळकट होत असलेले पाहून त्यांना अधिक आनंद झाला असता असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 10:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...