Home /News /mumbai /

"पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक केलं, हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा"

"पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक केलं, हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा"

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

मुंबई, 8 मे: राज्यातील कोरोनाची परिस्थिती (Coronavirus in Maharashtra) आणि वैद्यकीय सुविधा यांच्यासंदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोविड-19 संसर्ग (Covid-19 spread) संदर्भातील उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. यावेळी पंतप्रधानांनी रोज्याच्या कोरोना विरोधातील लढाईविषयी कौतुक केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं. यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी महाराष्ट्र चांगली लढाई करत आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलं. मात्र, आता यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये प्रवीण दरेकर लिहितात, "मुंबई आणि महाराष्ट्राची कोविड नियंत्रणाची परिस्थिती वाईट असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही. हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा वाटतो!" वाचा: पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक, म्हणाले... मुख्यमंत्री - पंतप्रधानांमध्ये चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून राज्यातील कोविड-19 संसर्ग संदर्भातील उपाययोजनांची माहीती दिली. तसेच राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याचीही मागणी केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांत आँक्सिजनची कमतरता आजही जाणवतेय. त्यासाठी इतर राज्यांतून आँक्सिजनचा पुरवठा तात्काळ राज्याला मिळावा अशी मागणीही त्यांनी केलीय. त्याचबरोबर राज्याला विदेशातूल लस आयात करण्याची परवानगी मिळावी ही मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्रयाकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, PM narendra modi, Pravin darekar

पुढील बातम्या