भाजप उडवणार प्रचाराचा धुराळा, मोदी आणि शहांचा असा आहे 'मेगा प्लान'

भाजप उडवणार प्रचाराचा धुराळा, मोदी आणि शहांचा असा आहे 'मेगा प्लान'

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील संयुक्त सभेने होणार प्रचाराची सांगता होणार आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 01 ऑक्टोंबर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची खरी रणधुमाळी आता सुरू होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलीय. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला असा दावा भाजपने केलाय. आता खरी लढाई सुरू होणार असून भाजपने प्रचाराचा 'मेगा प्लान' तयार केलाय. प्रचारात भाजपची कायम आघाडी असते. याही निवडणुकीत भाजप सर्वच साधनांचा वापर करणार असून प्रचारात भाजपचा हुकूमी एक्का असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका असणार आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 सभा होणार असून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 20 सभा होणार आहेत. राज्याच्या कुठल्या भागात या सभा घ्यायच्या याचं नियोजन भाजपचे ज्येष्ठ नेते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रचारातले स्टार प्रचारक असणार आहेत. डिजीटल आणि सोशल मीडियाचा अतिशय प्रभाविपणे वापर करण्याचं भाजपने नियोजन केलंय त्यामुळे प्रचार जोरदार रंगण्याची शक्यता आहे.

'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय';खडसेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री घेणार राज्यात तब्बल 100 सभा

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याही सभांचा धडाका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जवळपास 100 सभा घेणार. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील संयुक्त सभेने होणार प्रचाराची सांगता. राज्यात भाजपच्या प्रचारासाठी देशभरातून नेते मंडळी येणार. यात जे पी नड्डा,स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, गौतम गंभीर, प्रकाश जावडेकर, राजवर्धन राठोड असे नेते प्रचारासाठी येणार आहेत.

'शरद पवार आणि अजित पवार म्हणजे ठग्ज् ऑफ ठेवीदार'

भाजपच्या प्रचारातले नवे चेहेरे

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला 20 दिवस राहिले असताना भारतीय जनत पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या पहिल्या यादीत भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांना स्थान दिलंय. तर विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्व्हेत काही उमेदवारांबाबत लोकांचा नकारात्मक सूर आला होता. त्यामुळे अशा नेत्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आलाय. तर दिग्गज उमेदवारांमध्ये नागपूर दक्षिण-पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, कोथरूड - चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आलीय. या यादीत अनेक नवे चेहेरे असून भाजपने डावपेच आखत डाव खेळलाय.

मुख्यमंत्री फडणवीस यांना SCकडून धक्का; ऐन विधानसभा निवडणुकीत दाखल होणार खटला!

महायुतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे करतील असं असं सांगण्यात आलं होतं. मात्र बंडखोरीची शक्यता आणि अवघड प्रश्नांची उत्तरं टाळण्यासाठी महायुतीची घोषणा पत्रकाद्वारेच करण्यात आली. तर जागावाटप करतानांही फार गाजावाजा करण्यात आला नाही. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात भाजपला 146, शिवसेनेना 124 तर मित्र पक्षांना 18 जागा देण्यात आल्या आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 1, 2019, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading