मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

त्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण

त्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण

Narendra Modi on Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

Narendra Modi on Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

Narendra Modi on Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

मुंबई, 8 जून: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली आणि मविआ सरकारने (MVA Government) निवेदनही केंद्र सरकारला दिले. पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत भेटीत चर्चेबाबत माहिती दिली. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली. काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया मुंबईत झाली होती. त्यामुळेच पीएम मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवारांची प्रकृती आता कशी आहे अशी अजित पवारांकडे पंतप्रधानांनी विचारणा केली. शरद पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना विचारला. यावर अजित पवारांनी म्हटलं, होय तब्येत व्यवस्थित आहे. भेट सुरू होण्यापूर्वी ही पवारांच्या प्रकृतीची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणासह 12 मुद्द्यांवर चर्चा करुन निवेदन सुद्धा देण्यात आले.

'मी काही नवाझ शरीफांना भेटायला गेलो नव्हतो', मुख्यमंत्र्यांचा ठाकरी टोला

खालील विषयांवर मोदींसोबत चर्चा

एसईबीसी मराठा आरक्षण

इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण

मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण

मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे

राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई

पिक विमा योजना : बीड मॉडेल

बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी

नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे

14 व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक )

14 व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था )

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवड करण्याबाबत

First published:

Tags: Narendra modi, Sharad pawar, Uddhav thackeray