मुंबई, 26 डिसेंबर : 'कोरोनाचे (corona) संकट अजून टळले नाही. आता ओमायक्रॉनचे (Omicron ) नवे संकट आपल्यासमोर येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा, मास्क वापरा. कोरोनाचे आलेले संकट आपल्याला पुन्हा एकदा टाळायचे आहे. ओमायक्रॉनच्या संकटामुळे पॅनिक होऊ नका पण सतर्क राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी १० जानेवारीपासून आरोग्य सेवक, डॉक्टर्स तसंच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.
'ओमायक्रॉन जगभरात पसरत आहे. आपले भारतीय संशोधक त्यावर नजर ठेवून आले. आतापर्यंत आपल्याकडे 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे १५ वर्षांपासून मुलांना लस घेता येणरा आहे. पुढील महिन्यात ३ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.
3 जनवरी, 2022 से 15 साल से 18 साल की आयु के बीच के बच्चों के लिए देश में वैक्सीनेशन प्रारंभ होगा। सरकार ने निर्णय लिया है कि हेल्थकेयर और फ्रंटलाइन वर्कर्स को वैक्सीन की प्रीकॉशन डोज भी प्रारंभ की जाएगी। इसकी शुरुआत 2022 में, 10 जनवरी से की जाएगी: प्रधानमंत्री @narendramodi pic.twitter.com/LoNvfryJiM
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) December 25, 2021
'देशात कोरोनाचे संकट आले पण अजून हे संकट टळले नाही. त्याला रोखण्यासाठी आपण लसीकरण सुरू केले. मागील वर्षी 16 जानेवारीपासून आपण नागरिकांना लसीकरण सुरू केले होते. देशातील नागरिकांनी या अभियानाला साथ दिली. त्यामुळे भारतात 141 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे अभूतपूर्व आणि अवघड असे लक्ष पार केले, अजूनही देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
Weight loss : रात्री चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; वजन नियंत्रणात ठेवणं होईल अशक्य
'देशात लवकरच नाकाने लस देण्याची पद्धत सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे. गेल्या १२ महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.