मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /पंतप्रधान मोदी भावूक झाले, हा ठरवून झालेला कार्यक्रम, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

पंतप्रधान मोदी भावूक झाले, हा ठरवून झालेला कार्यक्रम, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप


'पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील'

मुंबई, 23 मे : देशभरात कोरोनामुळे (Corona) मृत्यू झालेल्या व्यक्तींबद्दल भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) भावूक झाले होते. पण,  'त्याचदिवशी' परचा आणि मास्क दोन्ही गायब होते याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोपच राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बोलताना मोदीसाहेब नेहमी परचा आणि मास्क वापरत होते. मात्र त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.

WhatsApp वरही Schedule करू शकता मेसेज, जाणून घ्या सोपी ट्रिक

'देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला.औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले की, ते भावूक झाले याबाबत लोकं प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिला 1KG चा सोन्याचा हार भेट? VIRAL VIDEO मागचं सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 मे रोजी वाराणसीतील स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 'लशीमुळे आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सना संरक्षण मिळाले आहे, जे देशातील नागरिकांची सेवा करत आहेत. येणाऱ्या दिवसात लशीचे संरक्षण सर्वांना उपलब्ध होईल. लस ही सर्वांनी घेणे आवश्यक आहे. आपली लढाई एका अदृश्य, धूर्त अशा रुप बदलणाऱ्या दुश्मनाशी आहे. अशावेळी आपण सतर्क राहिले पाहिजे. यातून लहान मुलांना वाचवणे आवश्यक आहे आणि त्याकरता योग्य पावलं उचलणंही गरजेचं आहे' असंही मोदी म्हणाले.

First published:

Tags: Nawab malik