भाषणनाट्यावर पडदा? अजितदादांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत घेऊन पंतप्रधान पोहोचले मुंबईत!
मुंबई पालिकेच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर अर्थात मान्सूननंतर होण्याची शक्यता आहे. त्या वेळी मुंबई पालिका पावसाळ्यातल्या गैरव्यवस्थापनामुळे सर्वांच्या रोषाची धनी बनलेली असते. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray in Ayodhya) यांनीही मुंबई पालिकेच्या पावसाळी तयारीच्या बैठकीनंतर असं वक्तव्य केलं होतं, की एका दिवसात 200 मिमी पाऊस पडला, तर मुंबईत पूर येणारच. निसर्गाच्या या रौद्ररूपाला कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारची हतबलता आहे. भाजपला मिळणार बळ दरम्यान, रस्त्यांची वाईट परिस्थिती, ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवण्यात आलेलं अपयश यांसारख्या अन्य मुद्द्यांवरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू, तसंच मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यांचे अन्य कार्यक्रम तर आहेतच; पण मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या प्रचारमोहिमेला आणि कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेचा पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने उभ्या केलेल्या कठीण आव्हानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कोणताही राजकीय अर्थ नसल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात असून, यापूर्वीही शिवसैनिकांनी अयोध्या दौरे केले आहेत, असं सांगण्यात येत आहे; मात्र राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांनी नव्याने दिलेल्या हिंदुत्वाच्या घोषणेला आव्हान देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा दौरा असू शकतो, असे आडाखे बांधले जात आहेत. मुंबईतल्या मतदारांमध्ये सुमारे 20 टक्के उत्तर भारतीय आहेत. त्यांची मतं मिळवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा दौरा उपयोगी ठरू शकतो, असंही बोललं जात आहे. फडणवीसांना बोलू दिलं, अजितदादांना का नाही? हा महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळे भडकल्या काँग्रेस शांतच.. राज्याच्या सत्तेत शिवसेनेसोबत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षात अद्याप मुंबई निवडणुकीच्या अनुषंगाने सामसूमच असून, वरिष्ठ पक्षनेत्यांनी याबद्दल नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात मुंबई काँग्रेस कार्यकारी समितीचे 150 सदस्य अखिल भारतीय काँग्रेसचे (Congress) सचिव आणि महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांना भेटले. तसंच, आशिश दुआ, संपत कुमार आणि सोनल पटेल या तीन सचिवांसह अन्य पदाधिकाऱ्यांनाही भेटले; मात्र त्या वेळी मुंबई पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कोणतीही विशिष्ट चर्चा झाली नाही. 'त्या दिवशी यावर चर्चा होणं अपेक्षित होतं; मात्र ती झाली नाही. ती नंतर होणं अपेक्षित आहे. निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने आता आमच्या हातात फारसा वेळ नाही,' असं मुंबई काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं होतं. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं, 'मुंबई काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. भाई जगताप हे मुंबई प्रादेशिक काँग्रेस समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आता सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गेल्या निवडणुकीवेळी गांधी कुटुंबीय सक्रियपणे सहभागी झाले नव्हते. या वेळी तरी ते मुंबईत प्रचाराला येतील, अशी आशा आहे.'मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, BMC, Pm modi