मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /पंतप्रधान मोदी, 'मेहुलभाई..' बोलत होते मग तो देशातून पळाला कसा? मलिकांचा थेट सवाल

पंतप्रधान मोदी, 'मेहुलभाई..' बोलत होते मग तो देशातून पळाला कसा? मलिकांचा थेट सवाल

 'मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे, परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या, सुशील मोदी यांना कधी आणणार आहात'

'मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे, परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या, सुशील मोदी यांना कधी आणणार आहात'

'मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे, परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या, सुशील मोदी यांना कधी आणणार आहात'

मुंबई, 03 जून: पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी फरार मेहुल चोक्सी  (Mehul Choksi) अखेर सापडला आहे. लवकरच त्याला भारतात आणण्यात येणार आहे. पण, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई... मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही?' असा सवाल  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab Malik) यांनी केंद्र सरकारला केला आहे.

'मेहुल चोक्सीला भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 'मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे, परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या, सुशील मोदी यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.

बँडस्टँडचा फेरफटका पडला महागात; अखेर टायगर श्रॉफवर गुन्हा दाखल

'मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना का तत्परता मोदींनी दाखवली नाही, असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितलं.

सावधान! 'कोरोनाची तिसरी लाटही गंभीर, 98 दिवस असेल धोका'

दरम्यान, मेहुल चोक्सी  (Mehul Choksi) च्या भारत प्रत्यार्पणावरील सुनावणी बुधवारी पार पडली. मात्र डोमिनिका उच्च न्यायालयानं (Dominica HC Court) आपला निर्णय राखून ठेवला आहे. चोक्सीला भारतात पाठवले जाईल की अँटिग्वा येथे जावे लागेल यावर न्यायालय आज निर्णय देईल. दरम्यान, तुरुंगात असुरक्षित वाटत असल्यानं चोक्सीनं न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

First published: