महाराष्ट्रातील पहिल्या सभेआधी PM मोदींचे मराठीतून ट्वीट!

महाराष्ट्रातील पहिल्या सभेआधी PM मोदींचे मराठीतून ट्वीट!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. PM मोदींची वर्धा येथे पहिली सभा होणार आहे. या सभेला येण्याआधी मोदींनी ट्विटवरुन मराठीत ट्वीट केले आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यात भाजप-शिवसेना युती देखील मागे नाही. यासाठीच मोदी राज्यात 8 सभा घेणार आहेत.

महाराष्ट्रात येण्याआधी मोदींनी ट्वीटकरुन राज्यातील जनतेला नमस्कार केला आहे. आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.तसेच केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आ) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे! असे दुसरे ट्वीट त्यांनी केले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. चार टप्प्यांपैकी प्रत्येक टप्प्यात दोन अशा रितीने मोदी राज्यात एकूण 8 सभा घेणार आहेत. मोदींच्या या आठ सभेच्या दृष्टीने भाजपने नियोजन केले आहे. मात्र या सभा कुठे घ्यायच्या आणि सभांची संख्या वाढवायची काय याबाबतचा अंतिम निर्णय PM मोदीच घेणार आहेत. मोदींची पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा तर शेवटची सभा मुंबईत होणार आहेत.

मोदी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदींच्या शेवटच्या सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित व्यासपीठावर दिसणार आहेत. तर संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.


VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाहीबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 09:28 AM IST

ताज्या बातम्या