मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /PM Modi : कोरोनाची दुसरी लाट अजून गेली नाही - पंतप्रधान मोदी

PM Modi : कोरोनाची दुसरी लाट अजून गेली नाही - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल मुद्दे मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल मुद्दे मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल मुद्दे मांडले.

मुंबई, 07 जून : कोरोनाशी (Corona) लढा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Naredra Modi) यांनी जनतेशी संवाद साधून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी, पंतप्रधानांनी कोरोनाची दुसरी लाट गेली नाही, त्यामुळे संपूर्ण काळजी घ्या, असं आवाहन केलं. तसंच, 'देशात यापुढे सर्वांना मोफत लस (Free vaccination) देण्यात येणार आहे, राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल मुद्दे मांडले. 'देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. कोरोनाविरोधातल्या लढाईत आपण अनेकानां गमावलं. कोरोनामुळे ज्या लोकांचा मृ्त्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या सहवेदना कायम आहे.  गेल्या १०० वर्षातली ही मोठी महामारी आहे. कोविड हॉस्पिटल, औषध सेवा पुरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. नौदल, वायू सेना सर्वांनी जीवाची बाजी लावून काम केले.' असं सांगत कोरोना योद्ध्यांचं मोदींनी कौतुक केलं.

मोफत लसीकरणाची घोषणा

'१ मेपासून 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम राज्यांवर २५ टक्के  सोपवले होते. त्यांनी आपल्या परीने काम केले. पण, हे काम करत असताना किती अडचणी येतात हे लक्षात आहे. संपूर्ण देशात काय परिस्थिती आहे. ते यांच्या लक्षात आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लोकांकडून लशी मागणी वाढली. त्यामुळे राज्य सरकारांना कळून चुकले की पहिली व्यवस्था ही चांगली होती. एक चांगली गोष्ट राहिली, राज्य सरकार हे फेरविचार करून आमच्याकडे आले आणि देशातील नागरिकांना त्रास होऊ नये. त्यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राकडे घेण्यात आली आहे. देशातील सर्व लोकांना मोफत लस मिळणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली.

21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्या निमित्ताने 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पुढील कार्य पूर्ण करायचे आहे, असंही मोदींना स्पष्ट केलं.

तसंच, ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल, त्यांना खासगी रुग्णालयामध्ये लस घ्यायची असेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात. लसीची जी किंमत आहे, त्यावर 150 सर्व्हिस चार्जच खासगी हॉस्पिटल घेऊ शकतात, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार

कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांना पंधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सुविधा केली होती. हीच सुविधा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही कायम राहणार आहे. मे आणि जूनमध्ये ही योजना सुरू राहणार असून पुढे दिवाळीपर्यंत नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.

देशातील गरीब जनतेसोबत त्यांचे साथी बनून सरकार खंबीरपणे त्यांच्यासोबत उभं असल्याचं मोदी म्हणाले. 80 कोटीहून अधिक नागरिकांना आतापर्यंत मोफत धान्य देण्यात आलं आहे. ही सुविधा यापुढेही नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आता PM गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानातून मोफत धान्य घेऊ शकतात. देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये हेच यामागील उद्दिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले.

23 कोटी नागरिकांना लस देण्यात आली

जगात जिथे कुठे उपलब्ध होईल, ते सर्व भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या लढाईत लस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लशीची संपूर्ण देशातून मागणी आहे. लस बनवणारे देश मोजकेच आहे. भारतात जर लस बनवण्याची कंपनी जर नसती तर आपल्या या विशाल देशात काय अवस्था झाली असती. आधी भारताला विदेशातून लस मिळवण्यासाठी खूप कठीण काम होतं. बाहेरच्या देशात लस तयार झाल्यानंतर आपल्याला लस मिळत होती. पोलिओच्या लशीचे तसेच झाले' असंही मोदी म्हणाले.

2014 मध्ये देशातील जनतेनं आम्हाला काम करण्याची संधी दिली. तेव्हा वैद्यकीय अवस्था अत्यंत कठीण अशीच होती. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात भरीव काम केले. कोरोनाच्या काळात सर्वांना लस मिळावी यासाठी मिशन इंद्रधनुष्य लाँच केले. लहान मुलांना लसीकरण झाले पाहिजे. लहान मुलांची आपल्या देशात काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही लस देण्याचा प्रयत्न केला. पण, कोरोनाने विळखा घातला. पण नियत जर साफ असेल तर ध्येय स्पष्ट असेल तर कामात तुम्हाला यश मिळत जाते. वर्षाभरात भारताने एक नव्हे दोन लशी तयार केल्या. आम्ही कोणत्याही देशांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे. 23 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे' अशी माहितीही मोदींनी दिली.

आपल्या प्रयत्नात जेव्हा यश मिळते जेव्हा तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल. आपल्या शास्त्रांनी लस निर्माण करण्याची क्षमता होती, याबद्दल पूर्ण विश्वास होता. कोरोना काळात कोरोना लस टास्क फोर्सची निर्मिती केली. लस घेण्यासाठी मदत केली. सात वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहे. आणखी 3 कंपन्या काम करत आहे, असंही मोदींनी सांगितलं.

First published: