राज्यासाठी आनंदाची बातमी, हाफकिन संस्थेला कोरोना लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी

राज्यासाठी आनंदाची बातमी, हाफकिन संस्थेला कोरोना लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी

परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल :  राज्यापुढे कोरोनाचे (Corona) संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत लसीकरणावर जास्त भर देण्यात आला आहे. आता  हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे.

दीपिका पादुकोणने सोडलं सासर, नवरा रणवीरला घेऊन गेली माहेरी; समोर आलं असं कारण

सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसंच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ही MPV, सिंगल चार्जवर धावणार 522 KM

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.

त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आता स्वबळावर कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्मक लसचं उत्पादन करणार आहे. राज्याला 24 कोटी लसची गरज आहे. त्यासाठी आता लसींचं उत्पादन वाढवणार आहे. हाफकिन संस्थेत महिन्याला 1 कोटी पर्यंत लसींचं उत्पादन करण्याची क्षमता आहे.

Published by: sachin Salve
First published: April 15, 2021, 10:57 PM IST

ताज्या बातम्या