मुंबई, 19 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केलं. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो लाईन 2-A आणि मेट्रो लाईन 7 याचं लोकार्पण करण्यात आलं. मेट्रो लाईन 2-A दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिमच्या डीएन नगरपर्यंत 18.6 किमी आहे. तर मेट्रो 7 लाईन अंधेरी पूर्व ते अंधेरी पूर्व असा 16.5 किमीचा आहे.
मुंबई मेट्रोच्या 2 लाईनचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवास केला. अंधेरीच्या गोदिंवली ते मोगारापाडा असा प्रवास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर रवाना झाले. मुंबई मेट्रोमधून प्रवास करत असताना पंतप्रधानांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधला.
'मुंबईच्या विकासाला ब्रेक, महापालिकेत सत्ता आल्यास...', मोदींनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग
मुंबई मेट्रोतून प्रवास करत असताना पंतप्रधानांनी विद्यार्थी, गृहिणी, मुंबईकर तसंच ज्यांनी मेट्रो उभी केली त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसंच यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते.
मुंबई मेट्रोतून प्रवास करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसोबत काय बोलले? हे आता समोर आलं आहे. पंतप्रधान आणि विद्यार्थ्यांमधल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आम्हाला प्रवास करायलाच दीड तास लागतो, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. यानंतर पंतप्रधानांनी आता तुमचा वेळ वाचेल, असं सांगितलं.
तुमचा रोजचा किती वेळ वाचेल असं पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी 45 मिनिटं वाचतील, असं उत्तर दिलं. यानंतर मोदींनी या वेळेचा काय उपयोग कराल? असं विचारलं. विद्यार्थ्यांनी अभ्यास करू असं सांगितलं. यानंतर मोदींनी माझ्यासाठी एक काम कराल का? 15 मिनिटं योगा कराल का? असा प्रश्न पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारला. कठीण काम आहे, पण तुम्हाला स्वत:लाच करावा लागेल, असं मोदी म्हणाले. यानंतर विद्यार्थ्यांनीही पंतप्रधानांना योगा करणार असल्याचं आश्वासन दिलं.
फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात, शिंदेंचं कौतुक, मोदींनीही वाजवल्या टाळ्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Narendra Modi