मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"...मग पंतप्रधानांचाही चार्ज दुसऱ्यांकडे द्या" नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

"...मग पंतप्रधानांचाही चार्ज दुसऱ्यांकडे द्या" नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

"...मग पंतप्रधानांचाही चार्ज दुसऱ्यांकडे द्या" मुख्यमंत्र्यांचा चार्ज दुसऱ्याला देण्याची मागणी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना नाना पटोलेंचा टोला

"...मग पंतप्रधानांचाही चार्ज दुसऱ्यांकडे द्या" मुख्यमंत्र्यांचा चार्ज दुसऱ्याला देण्याची मागणी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना नाना पटोलेंचा टोला

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा चार्ज इतर कुणाला तरी द्यावा अशी मागणी केली. त्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे.

मुंबई, 22 डिसेंबर : आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly winter session) सुरू झाले. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अधिवेशनात उपस्तित राहू शकले नाहीत. यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांचा चार्ज इतर कुणाकडे द्यावा असं वक्तव्य केलं. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. पंतप्रधानांचाही चार्ज दुसऱ्यांकडे द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आधी संसदेची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच उपस्थित नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्या, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. वाचा : भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, विधानसभेत विरोधक आणि भास्कर जाधवांमध्ये खडाजंगी यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली आहे. ते अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणार आहेत आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. परंतु विरोधक मात्र विनाकारण त्यावरून राजकारण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा लोकसभा व राज्यसभेत उपस्थित नसतात त्याची माहिती भाजपाने आधी घ्यावी व नंतर बोलावे. पंतप्रधानही सभागृहात नसतात मग त्यांचा चार्जही दुसऱ्या मंत्र्याकडे द्यावा. राज्यातील नोकर भरतीच्या प्रश्नावर सभागृहात बोलताना नाना पटोले म्हणाले की, पेपरफुटीच्या घटनांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण हे घोटाळे कुठून सुरु झाले आणि याचे तार कुठपर्यंत जोडले गेले आहेत याची माहिती राज्याच्या जनतेपर्यंत गेलीच पाहिजे. तरुणांची जी गैरसोय झाली त्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. शासनामार्फत काय कारवाई केली जात आहे हे जनतेला कळले पाहिजे. या प्रकरणाचे तार कुठपर्यंत आहेत त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. वाचा : 'त्या' घटनेनंतर भास्कर जाधवांनी सभागृहाची मागितली माफी, म्हटलं... चंद्रकांत पाटील म्हणतात, "उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर..." भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी चार्ज कुणाला तरी द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर त्यांचा विश्वास नाहीये, हे स्वाभाविक आहे. कारण चार्ज घेतला तर सोडणारच नाही. आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यावा. राज्याला मुख्यमंत्री नाही, सभागृहाला मुख्यमंत्री नाही. सह्या करायला मुख्यमंत्री नाही ही स्थिती राज्याच्या हिताची नाही. चंद्रकातं पाटील म्हणाले, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे थेट चार्ज देता येणार नाही. आधी त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल. ज्याने शपथ घेतली आहे अशाच व्यक्तीकडे चार्ज द्यावा लागतो. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला काही हरकत नाही पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला आहे.
First published:

Tags: Chandrakant patil, Nana Patole, Winter session

पुढील बातम्या