'थँक्यू गोडसे, नोटांवरून गांधींचा फोटो हटवा' महिला IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त ट्वीट

'थँक्यू गोडसे, नोटांवरून गांधींचा फोटो हटवा' महिला IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त ट्वीट

महिला आयएएस अधिकरी निधी चौधरीवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जून : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे एक महिला आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निधी चौधरी असं या महिला अधिऱ्याचं नाव असून त्यांनी 17 मे ला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्वीट केलं होतं. पण नंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानं त्यानं आपलं ट्वीट डिलिट केलं मात्र तोपर्यंत या ट्वीटचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यामुळे आता महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.महात्मा गांधींविषयी ट्वीट करताना निधी यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना धन्यवाद दिले. त्यांनी लिहीलं, "महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी थँक्यू गोडसे."


निधी चौधरी यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी आपलं ट्वीट डिलिट केलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी गांधींजींच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करत, लोकांनी माझ्या ट्वीटचा विपर्यास केला त्यामुळे मी माझं ट्वीट डिलिट केल्याचं स्पष्टीकरण दिलं. महात्मा गांधींचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता असंही त्यांनी आपल्या आत्ताच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.निधी चौधरी या आयएएस 2012 बॅचच्या असून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) आहेत. याआधी त्या मुंबई महानगरपालिकेच्याच सहाय्यक कलेक्टर होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 10:13 PM IST

ताज्या बातम्या