Home /News /mumbai /

Jitendra Awhad: अन् जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडून राज ठाकरेंना केली 'ही' विनंती

Jitendra Awhad: अन् जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडून राज ठाकरेंना केली 'ही' विनंती

अन् जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडून राज ठाकरेंना केली 'ही' विनंती

अन् जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडून राज ठाकरेंना केली 'ही' विनंती

Jitendra Awhad appeal to Raj Thackeray: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना हात जोडून एक विनंती केली आहे.

    मुंबई, 4 एप्रिल : गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या या भाषणात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे यांच्या या भाषणावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या. त्याच दरम्यान आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंना हात जोडून एक विनंती केली आहे. मशिदीवर भोंगे लावल्यास त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल असंही विधान केलं. राज ठाकरे यांनी केलेल्या या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, नाशिकमध्ये विविध ठिकाणी मनसेच्या कार्यालयांवर भोंगे लावत हनुमान चालिसा लावली. यानंतर पोलिसांनीही हे भोंगे जप्त करत कारवाई केली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. वाचा : राज ठाकरेंच्या भाषणातील 'त्या' विधानानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे जितेंद्र आव्हाडांचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीयेत. गॅस पेट्रोल डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत. काय म्हणाले होते राज ठाकरे? मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, 'मी धर्मांध नाही..प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी मशिदींवरील भोंग्याबाबत मी बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहे. यापुढे सरकारने मशिदीतील हे भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमान चालीसा वाजवू', यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मदरशांवर धाडी टाका, बघा तुम्हाला काय काय सापडले, असंही ते यावेळी म्हणाले. आव्हाडांनी राज ठाकरेंना दिलं होतं ओपन चॅलेंज गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जातीवाद केल्याचा गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले होते. 'मला आश्चर्य वाटतं जो माणूस एका प्रगतशील विचारांचा वाटायचा की, माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का? अधोगती आहे कळत नाही? मुंब्य्राचं नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, या सकाळी लवकर उठून मुंब्य्राच्या एका मदरसाच्या घरात, दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असा आव्हानच आव्हाडांनी राज ठाकरेंना दिलं होतं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Jitendra awhad, MNS, NCP, Raj Thackeray

    पुढील बातम्या