S M L

सावधान !, डोंबिवलीतही आढळली प्लॅस्टिकची अंडी

कोलकाता,चेन्नई पाठोपाठ आता डोंबिवलीतही अंड्यात प्लॅस्टिक सापडल्याचं पुढे आलंय.

Sachin Salve | Updated On: Apr 5, 2017 06:00 PM IST

सावधान !, डोंबिवलीतही आढळली प्लॅस्टिकची अंडी

05 एप्रिल:  'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' असं जरी असलं तरी आता अंडी खात असाल तर जरा जपून खा...कोलकाता,चेन्नई पाठोपाठ आता डोंबिवलीतही अंड्यात प्लॅस्टिक सापडल्याचं पुढे आलंय. डोंबिवलीतल्या गोग्रासवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारे शिक्षक अमेय गोखले यांनी काल (मंगळवारी) रात्री एका दुकानातून अंडी विकत घेतली त्यातील 2 अंड्याचे आॅम्लेट केला असता त्यातून जो वास येतो तो आला नाही आणि त्याची चव वेगळी एरवी पेक्षा वेगळी लागली.

म्हणून गोखले यांनी अंड्याचे टरफल तपासली त्यात त्यांना प्लास्टिक आढळून आले. या पूर्वी सुद्धा अशा घटना आपल्या देशात घडल्या आहेत. आता सर्व प्रकाराकडे राज्यसरकार लक्ष देईल का हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close