डोंबिवलीमध्ये पुन्हा सापडली प्लॅस्टिकची अंडी ?

डोंबिवलीमध्ये पुन्हा सापडली प्लॅस्टिकची अंडी ?

दावडी परिसरात राहणाऱ्या नवनाथ लोखंडे यांनी घरी आणलेल्या अंड्यात प्लॅस्टिक सदृष्य पदार्थ आढळला

  • Share this:

10 एप्रिल : डोंबिवलीत चार दिवसांपूर्वी अंड्यातून प्लॅस्टिकसदृष्य पदार्थ सापडल्याची घटना समोर आल्यानतंर आज पुन्हा तशीच एक घटना घडलीय.

डोंबिवलीतील दावडी परिसरात राहणाऱ्या नवनाथ लोखंडे यांनी घरी आणलेल्या अंड्यात प्लॅस्टिक सदृष्य पदार्थ आढळलाय. अंडी खाताना संशय आल्यामुळे त्यांनी ती नीट निरखून पाहिली असता अंड्याचा बलक वेगळा असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधून ही अंडी पुढील तपासणीसाठी त्यांच्या ताब्यात दिली. दरम्यान हे प्रकार वाढायला लागल्यामुळे ही अंडी पुढील तपासासाठी प्रयोगशाळेच पाठवण्याचं आश्वासन अन्न आणि औषध प्रशासनाने दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 09:55 PM IST

ताज्या बातम्या