शासकीय कार्यालयात प्लास्टिक बॉटल्स आणि पिशव्यांवर बंदी

शासकीय कार्यालयात प्लास्टिक बॉटल्स आणि पिशव्यांवर बंदी

. यापुढे मंत्रालयात प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी आणणार असल्याचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केला.

  • Share this:

16 नोव्हेंबर : प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाने स्वतःपासून सुरुवात केलीये. यापुढे मंत्रालयात प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी आणणार असल्याचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केला.

आज मंत्रालयात पर्यावरण विभागाची बैठक पार पडली. या प्लॅस्टिकमुक्त मंत्रालयाची घोषणा करण्यात आली. तसंच सगळ्या शासकीय कार्यालयात प्लास्टिक बॉटल्स आणि पिशव्यांवर बंदी आणणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं. दुधाच्या, तेलाच्या, औषधांच्या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करणार असल्याचंही ते म्हणाले. तसंच कापडी पिशव्या बनवण्यासाठी महिला बचत गटांना निधी देणार आहे.

कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद केली जाईल. यात 3 ते 6 महिने शिक्षा आणि लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे अशी माहितीही कदम यांनी दिली.

First published: November 16, 2017, 11:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading