S M L

प्लास्टिकबंदीत अमृताताई आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांच्या दबावाचा प्रश्नच नाही-रामदास कदम

गुजरात मधून येणारं प्लास्टिक पर्यावरण विभागाने महाराष्ट्राच्या सीमेवरच अडवलं आणि ५० टन प्लास्टिक ताब्यात घेतलं.

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2018 05:42 PM IST

प्लास्टिकबंदीत अमृताताई आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांच्या दबावाचा प्रश्नच नाही-रामदास कदम

मुंबई, 22 जून : राज्यात 80 टक्के प्लास्टिक हे गुजरातमधून येत असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीच्या मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आपल्यासोबत असल्यामुळे माझ्यावर कुणाचाही दबाव नसल्याचंही रामदास कदमांनी सांगितलंय.

राज्यभरात उद्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीसाठी कंबर कसली आहे. उद्यापासून राज्यात पूर्णपणे प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. यासाठी पूर्ण तयारी आणि पर्यायी तयारी करण्यात आली आहे.  पहिल्यांदा जर कुणी दोषी आढळलं तर पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.

या प्लास्टिकवर बंदी नाही!

तसंच महाराष्ट्रात येणारं प्लास्टिक मोठ्या प्रमाणात गुजरात मधून येतंय. त्यामुळे गुजरात मधून येणारं प्लास्टिक पर्यावरण विभागाने महाराष्ट्राच्या सीमेवरच अडवलं आणि ५० टन प्लास्टिक ताब्यात घेतलं. गुजरातमधील उद्योगावर मी गदा आणली म्हणून महाराष्ट्रचे मुख्यमंत्री माझ्यावर दबाव आणतील का अशी शक्यता मला वाटत होती. मात्र मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता फडणीस या आमच्यासोबत प्लास्टिक बंदी करण्यासाठी होत्या म्हणून मी निर्धास्त होतो. अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.

उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नका!

दरम्यान, प्लास्टिक बंदीवर आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याऱ्यांचं स्वागत केलंय.

तर सरकारने उद्यापासून केलेल्या प्लास्टिकंबदीला सिने अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांनीही पाठिंबा दर्शवलाय. राज्य सरकार आणि बीएमसीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे दोघे सहभागी झालेत. या प्लास्टिक बंदीला पर्याय काय यासंबंधीचं प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close