• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • बुलेट ट्रेनला फक्त राजकारणासाठी विरोध-पीयूष गोयल यांची टीका

बुलेट ट्रेनला फक्त राजकारणासाठी विरोध-पीयूष गोयल यांची टीका

पीयूष गोयल म्हणाले की बुलेट ट्रेनला विरोध करणारे जुन्या विचारांचे आहेत. याच विचारसरणीमुळं भारतीय रेल्वे 100 वर्ष मागे राहिल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. कुठलाही विचार न करता काही लोक फक्त राजकारणासाठी विरोध करतात.

  • Share this:
मुंबई,01 ऑक्टोबर: बुलेट ट्रेनला फक्त राजकारणासाठी विरोध केला जातो आहे अशी टीका रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. बुलेट ट्रेन विरोधी वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी चोख उत्तर दिलं आहे. बुलेट ट्रेनची एक वीटही मुंबईत रचू देणार नाही अशी टीका राज ठाकरेंनी शनिवारी केली होती. तर बुलेट ट्रेनचं ओझं आमच्यावर नको अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. याला उत्तर देताना पीयूष गोयल म्हणाले की बुलेट ट्रेनला विरोध करणारे जुन्या विचारांचे आहेत. याच विचारसरणीमुळं भारतीय रेल्वे 100 वर्ष मागे राहिल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. कुठलाही विचार न करता काही लोक फक्त राजकारणासाठी विरोध करतात. या नेत्यांना आधुनिक तंत्रज्ञान भारतात येवू द्यायचं नाही असा आरोपही त्यांनी केला. तसंच टीका करणाऱ्यांनी आम्हाला सूचना द्याव्या आम्ही त्या स्वीकारू असंही पीयूष गोयल यांनी सांगितलं. दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर 61 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 92 नवीन सरकते जिने येतील अशी घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली आहे. मध्य रेल्वेवरचे 20 तर पश्चिम रेल्वेवर 13 पादचारी पूल रुंद करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच 10 नवीन पादचारी पूल बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कल्याण यार्डचे काम वेगाने मार्गी लावले जाणार आहे. या निर्णयांचा सुमारे 80 लाख प्रवाशांना फायदा होणार.
First published: