महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पुढे ढकला, हायकोर्टात याचिका!

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पुढे ढकला, हायकोर्टात याचिका!

कोल्हापूर आणि सांगली या भागात महापूराने थैमान घातलं होतं. तर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारलीय. त्यामुळे नागरिकांना प्रचंड संकटाला सामेरं जावं लागतंय. या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आलीय.

  • Share this:

मुंबई 13 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा लकरच होण्याची शक्यता आहे. असं वातावरण असतानाच ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. महाराष्ट्रात ओला आणि तीव्र दुष्काळ असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आलीय. ज्या भागांमध्ये हा दुष्काळ आहे. त्या भागात 40 टक्के मतदार आहेत असंही याचिकेत म्हटलं आहे. कोल्हापूर आणि सांगली या भागात महापूराने थैमान घातलं होतं. तर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारलीय. त्यामुळे नागरिकांना प्रचंड संकटाला सामेरं जावं लागतंय. या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आलीय.

अटलजीं'च्या स्मारकासाठी भूखंड हडपला? सरकारनं दिलं हे उत्तर!

कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापूराने अनेक गावं पाण्याने वेढली होती. हजारो संसार उद्धवस्त झाले होते. हजारो घरांमध्ये पाणी घुसलं होतं. शेती पाण्यात गेली होती. त्यामुळे लोकांना मोठा फटका बसलाय. त्यांच्या पुनर्वसानचं काम सध्या सुरू असलं तरी त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे लोकांची पुन्हा घडी बसायला वेळ लागणार आहे.

तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारलीय. चारा छावण्या सुरू आहेत. नागरिकांना दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागताहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही लोकांना मोठा फटका बसलाय. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होतेय.

केंद्रातलं सरकार हे 'दारुड्यां'चं, प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

मनसेचं तळ्यात मळ्यात

लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उडविणाऱ्या राज ठाकरे यांची तोफ विधानसभा निवडणुकीत धडाडणार का? याबाबत सध्या संभ्रम निर्माण झालाय. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर आज नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक कुठल्याही निर्णयाविनाच संपली. विधानसभा निवडणुकीबाबात काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरे लवकरच सांगतील अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा सुरू झालीय.

'राजे गेले, सेनापती गेले पण मावळे आमच्या सोबत'

या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती देताना सांगितलं की, बैठकीत काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी आणि काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली. राज ठाकरे यांनीही आपले विचार व्यक्त केलेत. आता काय निर्णय घ्यायचा हे राज ठाकरे ठरवणार असून लवकरच ते आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 13, 2019, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading