मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज ठाकरेंचा साधेपणा पाहून BMC चे कर्मचारी गेले भारावून!

राज ठाकरेंचा साधेपणा पाहून BMC चे कर्मचारी गेले भारावून!

राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नेहमी प्रमाणे शिवाजी पार्कमध्ये टेनिस खेळण्यासाठी येत असतात. गुरुवारी सुद्धा राज ठाकरे टेनिस खेळण्यासाठी आले होते

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 14 नोव्हेंबर :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणातली फटकेबाजी सर्वश्रूत आहे. त्यांचा रांगडा स्वभाव पत्रकार आणि तमाम कार्यकर्त्यांना चांगलाच परिचित आहे. पण राज ठाकरे यांच्यातला साधेपणा आज पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला. राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नेहमी प्रमाणे शिवाजी पार्कामध्ये टेनिस खेळण्यासाठी येत असतात. गुरुवारी सुद्धा राज ठाकरे टेनिस खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवाजीपार्क परिसरात काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांच्या विनंतीला मान दिला फोटो काढण्यासाठी पुढे आले. फोटो काढत असताना राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दिलखुलासपणे फोटो काढला. राज ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर हात ठेवल्याचे पाहून कर्मचारी भारावून गेले.  मुंबई दिवसरात्र स्वच्छ ठेवणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांना या फोटोच्या माध्यमातून एका प्रकारे कोविड योद्धा असलेल्याचं प्रशस्तीपत्रकच राज यांनी दिले. दरम्यान, शिवाजी पार्कमध्ये अमित ठाकरे यांनी त्यांचं फूटबॉलचं स्किल दाखवून दिलं. मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क मैदानात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनसाठी अमित ठाकरे आले होते. त्यावेळी शिवाजी पार्क मैदानात फूटबॉल फुटी या संस्थेची मुलं फूटबॉल खेळत होती. या मुलांनी अमित ठाकरेंना फूटबॉल खेळण्याची विनंती केली. अमित ठाकरे यांनीही या मुलांच्या विनंतीला मान देऊन फूटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
First published:

पुढील बातम्या