मुंबई, ०७ जुलै: शिवसेनेमध्ये बंड पुकारून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला असून कामाला लागले आहे. आज मुख्यमंत्री मंत्रालयात (mumbai mantralaya) पोहोचले आहे. आज त्यांचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला.
मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील दालनासमोर महिलांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केले. आज मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनाची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही फोटो लावला आहे.
कार्यभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने आपल्याला सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर द्यायचा आहे, अशी सूचनाही शिंदेंनी सर्वांना दिली.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सूनबाई वृषाली शिंदे आणि नातू सुद्धा आला आहे. मुळात शिंदे कुटुंबासाठी आजचा दिवस आभाळा एवढा मोठा आहे.एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून मोठे यश मिळवले आहे. शिवसेनेचा कार्यकर्त्या, पालिकेचे गटनेता, आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्रिपद मिळावले आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबांसाठी आज हा आनंदाचा क्षण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.