• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • रझा अकादमीसोबतचा फोटो 2016 चा पण.., आशिष शेलारांचं मलिकांना प्रत्युत्तर

रझा अकादमीसोबतचा फोटो 2016 चा पण.., आशिष शेलारांचं मलिकांना प्रत्युत्तर

'2016-2017 साली फोटोचा आणि याचा काय संबंध आहे. माझा या फोटोचा रझा अकादमीशी काही संबंध नाही. ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झाली नाही

'2016-2017 साली फोटोचा आणि याचा काय संबंध आहे. माझा या फोटोचा रझा अकादमीशी काही संबंध नाही. ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झाली नाही

'2016-2017 साली फोटोचा आणि याचा काय संबंध आहे. माझा या फोटोचा रझा अकादमीशी काही संबंध नाही. ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झाली नाही

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर : त्रिपुरातील कथित दंगलीवरून मालेगाव (malegaon) आणि अमरावतीमध्ये (amravati) हिंसाचाराची घटना घडली. तर दुसरीकडे, रझा अकादमीसोबत असलेल्या फोटोवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik)  यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांचा रझा अकादमीसोबत (Raza Academy) असलेल्या फोटो समोर आणला. त्यानंतर हा फोटो 2016 मधला असून कार्यालयात बैठक झाली नाही, असा खुलासा शेलार (ashish shelar)  यांनी केला. आशिष शेलार यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. 'तुमची खोड काही जात नाही. तुम्ही वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर राजकारण करण्याचा तुमचा धंदा आहे. त्रिपुरामध्ये घडलेल्या दंगलीचा आणि महाराष्ट्रामध्ये घडलेल्या दंगलीचा काय संबंध आहे.  2016-2017 साली फोटोचा आणि याचा काय संबंध आहे. माझा या फोटोचा रझा अकादमीशी काही संबंध नाही. ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झाली नाही' असा खुलासा शेलार यांनी केला. चिरंजीवीसोबत सलमान करणार डान्स; या सिनेमातून करणार टॉलीवूडमध्ये एंट्री 'जुन्या कुठल्या तरी फोटोचा संबंध देऊन या प्रकरणाशी जोडण्याचा दाखल देऊन आजच्या दंगलीशी जोडला जात आहे. महाविकास आघाडी सरकारचे अपयश लपवण्याचे काम करू नका. आम्हीही रझा अकादमीचे अनेक फोटो उद्यापासून दाखवायला सुरुवात करू त्यामुळे तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही' असा इशाराही शेलार यांनी दिला. काय म्हणाले होते मलिक? भाजपचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून बैठक करतायत, त्याचे फोटो आहेत. त्यांचा संबंध आहेत असं आपण म्हणू शकत नाही. रझा अकदमीच्या कार्यालयात बसून आशिष शेलार बैठक कशासाठी करत होते याचं उत्तर त्यांनीच द्यावं, असा थेट सवाल मलिक यांनी विचारला आहे. T20 World Cup : एरॉन फिंच, एमएस धोनी आणि दुबई.... तिघांमध्ये आहे खास कनेक्शन! मागील शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काही मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती. त्रिपुरा प्रकरणी बंद केला होता अशी माहिती मिळतेय. नांदेड, मालेगाव, अमरावती या शहरात बंद करण्यात आला होता.याप्रकरणी पोलिसांनी ज्यांनी दगडफेक केली होती त्यांना अटक केली आहे. मालेगावमध्ये एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर देखील एफआयआर दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.
  Published by:sachin Salve
  First published: