Home /News /mumbai /

फडणवीसांकडून आता 'डेटा बॉम्ब', केंद्रीय गृहसचिवांकडे करणार CBI चौकशीची मागणी

फडणवीसांकडून आता 'डेटा बॉम्ब', केंद्रीय गृहसचिवांकडे करणार CBI चौकशीची मागणी

याची पूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

    मुंबई, 23 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर आता भाजपचे विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांनी 'डेटा बॉम्ब' टाकला आहे. आपल्याकडे 3.6 जीबीचा डेटा असून त्यामध्ये पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांचे संभाषण आहे' असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे करणार आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'रश्मी शुक्ला या आर.आर.पाटील गृहमंत्री असताना संबंधीत पोलीस विभागात होत्या. शुक्ला यांना बदल्यांमध्ये काही व्यवहार सुरू असल्याचं कळालं होतं, त्यांनी ते पोलीस महासंचालकांना सांगितलं. त्यानंतर महासंचालकांनी कारवाई केली ती त्यांच्यावरच केली. 25 ऑगस्ट 2020 ला सीओआयने एक अहवाल महासंचालकांना दिला होता. त्यांनी ते पत्र हे मंत्रालयामध्ये पाठवले होते. सिताराम कुंटे यांनी या अहवालावर या गोष्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दाखवून त्यावर सीआयडी चौकशी करुन कारवाई केली गेली पाहिजे, असं स्पष्ट पत्र लिहिलं होतं. याची पूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संपूर्ण डेटा हा 3.6 जीबीचा डेटा आहे. मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांकडे देण्यात आली. पण जेव्हा हे लक्षात आलं की यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही', असा आरोप फडणवीसांनी केला. कोरफडची शेती करा आणि मिळवा लाखोंचा नफा, सोबत करा असा जोडव्यवसाय त्यानंतर कारवाई झाली ही रश्मी शुक्ला यांच्यावरच. शुक्ला यांची बदली करण्यात आली. त्यांना डीजी करण्याऐवजी त्यांच्या कनिष्ठांना पदोन्नती दिली. डीजी सिव्हील डिफेन्सचं पद दिलं जे अस्तिवातच नव्हतं. 25 ऑगस्ट 2020 पासून अत्यंत संवेदनशील प्रकरणावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ज्यांची नाव या पत्रात आहे, त्यांना त्याच ठिकाणी बदली करण्यात आली आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला. भारताने लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज?वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला 'या अहवालामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाव आहे. अनेक आयपीएस अधिकारी आहे. याची माहिती मी जाहीर करू शकत नाही. कारण हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. मी या पत्रकार परिषदेनंतर दिल्लीला जाणार आहे. केंद्रीय गृह सचिवांकडे याची माहिती देणार आहे आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणार आहे', असंही फडणवीसांनी स्पष्ट केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: देवेंद्र फडणवीस

    पुढील बातम्या