'फोन टॅपिंग' वादावर फडणवीसांनी सरकारला दिलं 'हे' आव्हान

'फोन टॅपिंग' वादावर फडणवीसांनी सरकारला दिलं 'हे' आव्हान

'फोन टॅप करणं ही आमची संस्कृती नाही. उलट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात निलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकरांचे फोन टॅप झाले होते.'

  • Share this:

मुंबई 24 जानेवारी : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यावेळच्या विरोधी पक्ष नेत्यांचे फोन टॅप झाल्याचं प्रकरण आता तापत आहे. त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होतोय. संजय राऊत आणि शरद पवार यांनीही हा गंभीर आरोप केलाय. त्यावरून टीका होऊ लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी थेट सरकारलाच आव्हान दिलंय. सरकारने चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर करावा असं आव्हानच त्यांनी दिलंय. फोन टॅप करणं ही आमची संस्कृती नाही असंही त्यांनी सांगितलं. फडणवीसांच्या या आव्हानामुळे आता राजकीय वाद आणखी पेटण्याची शक्यता आहेत.

फडणवीस म्हणाले, राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते!

या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठावूक आहे. तथापि, राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठावूक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी.

फडणवीस सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेले दीपक केसरकर यांनीही राजकीय नेत्यांचे फोन टॅप झाल्याचं फेटाळलं आहे. ते म्हणाले, भीमा कोरेगाव बाबत फोन टॅप होऊ शकतील. पण त्याचा अहवाल पोलिसांना द्यावा लागेल. राजकारणी लोकांचे फोन टॅप झाले नाही. असं असेल तर आम्हाला त्याची माहिती नाही. गेल्या सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना किती अधिकार होते हे सर्वांनाच माहित आहे. हवं असेल तर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करावी

सुधीर मुनगंटीवारांचा आरोप

सरकार भाजपा सेना युतीचं होते, त्यामुळे हा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास दाखवणाराही आहे. भाजपा सरकार फोन टॅपिंग करू शकत नाही. पण काँग्रेस एनसीपीचं आघाडी सरकार असताना निलम गोरे, मिलींद नार्वेकर यांचे फोन टॅप केल्याची घटना घडली होती हे विसरतां कसं येणार. आघाडी सरकारमध्ये फोन टॅपिंग प्रकार घडत होते हे सिद्ध झालं होतं असा आरोप केलाय.

VIDEO : हिटमॅन की सुपरमॅन? हवेत उडी मारत रोहितनं घेतला अविश्वसनीय कॅच

संजय राऊत काय म्हणाले?

मला आधीच माहीत होते की फोन टॅप होत होते. भाजपचे काही जवळचे माझे मित्र सुद्धा बोलले फोन टॅप होतोय म्हणून. शरद पवार एक मोठे नेते आहे, या आधी सुद्धा शरद पवारांवर हल्ला झाला होता. एका माथेफिरूने तो केला होता त्यात अशी सुरक्षा काढून टाकून काय साध्य करायला पाहिजे हे दिल्लीत बसलेल्या त्यांच्या गुरुंना कळायला हवं.

आता राज्यात सरकार स्थपन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे यामागे काय कुटनीती आहे हे बघावं लागेल. विरोधकांना काम करू द्ययाचं नाही असा रडीचा डाव खेळायचं हे राजकारण नाही. मी बाळासाहेब ठाकरे चा चेला आहे असं घाबरून भिऊन आम्ही काम करत नाही.

देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा घणाघाती आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

अडचण भाजप ची होईल की नाही माहीत नाही. पण ज्यांनी हे टॅपिंग केले त्या अधिकाऱ्यांच्या निष्ठा सुद्धा सरकारसोबत काय आहेत ते समोर आल्या आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, मी आणि माझ्यासोबत सुप्रिया सुळे यांचा सुद्धा फोन टॅप झालाय.

SBI Recruitment 2020: पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

निवडणूक काळात फोन टॅपिंग झालं, जागा वाटप वेळी झालं आम्हाला हे माहिती होतं पण आमही काही देशद्रोही कामं करत नव्हतो त्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला भीत नाही.

First published: January 24, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या