S M L

पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर

मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ पैसे तर डिझेल लिटरमागे ६९ रुपये ५४ पैसे इतके झाले आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 25, 2018 04:34 PM IST

पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर

मुंबई, 21 एप्रिल : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले असून मुंबईकरांवर नेहमीप्रमाणे सर्वोच्च दरबोजा पडला आहे. मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ पैसे तर डिझेल लिटरमागे ६९ रुपये ५४ पैसे इतके झाले आहे.

साडेचार वर्षांतील या सर्वोच्च दरावरून केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांनी शरसंधान केले असून इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तसेच महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 01:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close