मुंबईत देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल

मुंबईत देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल

राज्य सरकारने दुष्काळी अधिभारात ३ रुपयांनी वाढ केल्यामुळे मुंबईत देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल मिळतंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 23 एप्रिल : राज्य सरकारने दुष्काळी अधिभारात ३ रुपयांनी वाढ केल्यामुळे मुंबईत देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल मिळतंय. सध्या मुंबईतील पेट्रोलची किंमत ७७ रुपये ४५ पैसे असून दिल्लीतील किंमतीपेक्षा तब्बल १० रुपयांनी जास्त आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव सध्या ६८ रुपये २६ पैसे इतका आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हायवेजवळील ५०० मीटरच्या परिसरातील दारूची दुकानं बंद केल्याने होतं असलेले आर्थिक नुकसान भरून काढण्याकरता ही अधिभार वाढ सरकारने केल्याचं बोललं जातंय.

एकीकडे सरकार पेट्रोल-डिझेलचे दर रोजच्या रोज निश्चित करण्याच्या तयारीत आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने अचानक पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केल्याने, सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

First published: April 23, 2017, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading