उद्याच्या काँग्रेस बंदला मनसेची साथ, आक्रमक होण्याची मनसैनिकांना सूचना

उद्याच्या काँग्रेस बंदला मनसेची साथ, आक्रमक होण्याची मनसैनिकांना सूचना

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : पट्रोल, डिझेलच्या महागाई विरोधात काँग्रेसने सोमवारी बंद पुकारलाय शिवसेना-मनसेनं मतभेद विसरून या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन कॉंग्रेसने केल होतं. त्याला आता मनसेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये मनसेची साथ असणार आहे.

इंधन दरवाढीसाठी आता महाराष्ट्रात मनसे रस्त्यावर उतरणार आहे.

इंधन दरवाढीविरोधात उद्या काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. त्याला शिवसेना आणि मनसेनंही पाठींबा द्यावा असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होत. त्याला आज मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. पेट्रोल जिझेल दरवाढीविरोधात सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात मनसे बंद करणार आहे.

इंधन दरवाढीसाठी संपूर्ण मनसैनिक रस्त्यावर उतरणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आजच्या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्याचबरोबर उद्याच्या बंदमध्ये आक्रमक होण्याबाबतही सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान या बंदला मनसेनं आधीच पाठिंबा दर्शवलाय. आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते पाहावं लागलं. शिवसेना आणि मनसेनं मतभेद विसरून या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन काँग्रेसनं केलंय. त्यावर मनसेने हात पुढे केला आहे.

तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी असताना आता शिवसेनेनेही मित्रपक्षावर निशाणा साधलाय. मुंबईमधल्या काही पेट्रोल पंपावर वाढत्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीवरुन यही है अच्छे दिन असे फलक लावण्यात आलेत. त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये नेमकं काय होणार हे महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2018 01:21 PM IST

ताज्या बातम्या