पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असताना ऑक्टोबर महिन्यात मात्र मोठी घसरण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असताना ऑक्टोबर महिन्यात मात्र मोठी घसरण झाली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल झाले नसले तरी मंगळवारी किमतींमध्ये घसरण झाली होती. मंगळावारी पेट्रोलचे दर 6 ते 7 प्रति लीटर तर डिझेलचे भाव 10 ते 11 पैसे प्रति लीटरनं कमी झाल्या होत्या.

इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाईटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर (Today Petrol Prices) क्रमश: 72.92 रुपये, 78.54 रुपये, 75.57 रुपये आणि 75.72 रुपये प्रति लीटर आहेत. तर, या चारही महानगरांमध्ये डिजलचे दर (Petrol Diesel Price Today) क्रमश: 65.85 रुपये, 69.01 रुपये, 68.21 रुपये आणि 69.55 रुपये प्रति लीटर आहेत.

वाचा-Kashmir : दहशतवाद्यांनी केली 5 बंगाली मजुरांची हत्या, बिगर काश्मिरी लक्ष्य

ऑक्टोबरमध्ये 1.69 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल

ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार ऑक्टोबरमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये 1.69 रुपयांची घसरण झाली आहे. तर डिझेलच्या किमतींमध्ये 1.64 रुपये प्रति लीटरनं स्वस्त झाले आहे.

वाचा-लोकलमध्ये स्टंटबाजांचा उच्छाद, माकडचाळे करणाऱ्या तरुणाला बेड्या

दररोज सकाळी 6 वाजता बदलतात किमती

पेट्रोल-डिजेलचे दर प्रत्येक दिवशी कमी-जास्त होत असतात. सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असतात. यांच्या किमती या अबकारी दर, डिलर कमीशनच्या बदलांनुसार घडत असतात.

वाचा-SPECIAL REPORT : मोदींबरोबरच विराट कोहलीही आहे Hit List वर

SMS करा आणि जाणून घ्या पेट्रोलचे नवे दर

तुम्ही एका SMSने आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. SMSकरून इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249 या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. तर, बीपीसीएल ग्राहकांसाठी RSP<डीलर कोड> 9223112222 हा क्रमांक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 08:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading