मुंबई, 23 जून : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय कोंडीच्या (Maharashtra Political Crises) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या जया ठाकूर (Jaya Thakur) यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. जया ठाकूर यांनी याचिकेत मागणी केली आहे की, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा.
काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, गेल्या वर्षी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. पक्षांतरविरोधी कायद्याला बगल देऊन राजकीय पक्ष सरकार कसे पाडत आहेत, असे या याचिकेत सांगण्यात आले. विधानसभेचा राजीनामा देणाऱ्या आमदारांना पोटनिवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळते, तसेच ते नव्या सरकारमध्ये मंत्रीही होतात.
शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावल्याचे जया ठाकूर यांचे म्हणणे आहे. असे असतानाही सरकारने अद्याप उत्तर दाखल केलेले नाही. ज्याचा विविध राजकीय पक्ष सातत्याने गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे त्यांना या मुद्द्यावर पुन्हा न्यायालयात जावे लागले आहे. महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा उल्लेख करताना जया ठाकूर म्हणाल्या की, राजकीय पक्ष देशाची लोकशाही संरचना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची नितांत गरज आहे.
'शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच'; ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावताच अनिल परब यांची प्रतिक्रिया
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांच मनपरिवर्तन होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.