Home /News /mumbai /

BREAKING : शिवसेनेचीही सुप्रीम कोर्टात धाव, थोड्याच वेळात सुनावणीची शक्यता

BREAKING : शिवसेनेचीही सुप्रीम कोर्टात धाव, थोड्याच वेळात सुनावणीची शक्यता

 महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

    मुंबई, २९ जून : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे. राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीला पत्र पाठवले आहे. पण महाराष्ट्र सरकार आणि उपाध्यक्षांचे वकील सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीच्या विरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ३० जून रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राज्यपालांनी अवघ्या काही तासांमध्ये नोटीस बजावली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी हा वेळ अत्यंत कमी आहे. यावेळेत आमदारांना राज्यातून बोलावण्यास वेळ लागणार आहे, असा दावा सेनेनं केला आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून सुनावणी ११ जुलैला होणार आहे. सजर कोणताही राजकीय पेच निर्माण झाला तर आमच्याकडे या असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, त्यानुसार शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे -राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात आलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. 39 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे सविस्तर वृत्तांकन या माध्यमांनी केले आहे. -7 अपक्ष आमदारांचा ईमेल राजभवनाला 28 जून रोजी मिळाला आहे. या ईमेलमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील बहुमत गमावले असून लवकरात लवकर विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे -विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी 28 जून रोजी माझी भेट घेतली. त्यांनी मला राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहुमत गमावल्याचा दावा त्यांनी केला आहे. -राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारला सभागृहाचा पाठिंबा आणि विश्वास आहे, याची खात्री करण्याचा मला अधिकार आहे.त्यामुळे मी 30 जून रोजी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश देतो. - 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. या अधिवेशनात राज्य सरकारनं बहुमत सिद्ध करावे. विधानसभेचे कामकाज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता समाप्त व्हावे. -काही नेत्यांची प्रक्षोभत वक्तव्य लक्षात घेता विधिमंडळाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी -विधिमंडळाच्या कामकाजाचे प्रक्षेपण लाईव्ह करण्यात यावे. त्यासंबंधीची सर्व तयारी करावी
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या