मद्यप्राशन करण्यासाठी समान वयाची अट असावी, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

मद्यप्राशन करण्यासाठी समान वयाची अट असावी, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

मद्यप्राशन करण्यासाठी महाराष्ट्रात समान वयाची अट असावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. सागर मुंदडा यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 23 एप्रिल : मद्यप्राशन करण्यासाठी महाराष्ट्रात समान वयाची अट असावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. सागर मुंदडा यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. मद्यप्राशनाकरता एकसारखं वय नसणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य अाहे अशी माहितीही मुंदडा यांनी दिली आहे.

हार्ड ड्रिंक घेण्यासाठी २५ वर्ष वयाची अट आहे, बीअर घेण्यासाठी २१ वर्ष वयाची अट आहे तर १८ व्या वर्षी वाईन पिण्याची परवानगी आहे. बीअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाईनच्या तुलनेत कमी असूनही वाईन पिण्यासाठी कमी वयाची अट आहे. कमी वयात दारु पिण्याची सवय लागल्यानं तरुणाईपुढे आरोग्याचे मोठा धोके निर्माण होतात आणि त्यासाठी वय ठरवलं पाहिजे असं मुंदडा यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2017 05:14 PM IST

ताज्या बातम्या