मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई लोकलबाबत महत्त्वपूर्ण अपडेट, शिक्षकांना मिळाला मोठा दिलासा

मुंबई लोकलबाबत महत्त्वपूर्ण अपडेट, शिक्षकांना मिळाला मोठा दिलासा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

अनलॉक प्रक्रियेनुसार आता हळूहळू विशिष्ट घटकांसाठी ही सेवा खुली करण्यात येत आहे.

मुंबई, 13 नोव्हेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यास निर्बंध घालण्यात आले. मुंबईसारख्या दाट लोकसंख्या असणाऱ्या शहरात एकाचवेळी लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करणं शक्य नसल्याने अनलॉक प्रक्रियेनुसार आता हळूहळू विशिष्ट घटकांसाठी ही सेवा खुली करण्यात येत आहे. अशातच आता लोकल मधून शाळेच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

शिक्षक आणि शाळेत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना आजपासूनच मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील विनंती करणारं पत्र रेल्वेला लिहिल्यानंतर रेल्वे बोर्डाने शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली आहे.

'शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना आजपासून मुंबई लोकलने प्रवास करण्याची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संबंधितांनी आपलं ओळखपत्र सोबत बाळगणं आवश्यक असणार आहे. ही परवानगी फक्त शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी असल्याने इतरांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये,' असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

सरसकट सर्वांसाठी मुंबई लोकल केव्हा सुरू होणार?

मुंबई शहर हे भारतातील इतर शहरांच्या तुलनेत मोठं शहर आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत इथली लोकल सेवा सुरु करणं जास्त आव्हानात्मक आहे. सामान्य परिस्थितीत मुंबईमध्ये एका लोकलमधून 750 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. पण गर्दीच्या वेळी 4500 जण प्रवास करतात. त्यामुळे जर कोरोनापूर्वीच्या पद्धतीने लोकं लोकलने प्रवास करायला लागले तर मोठ्या गंभीर अडचणींना सामोरं जावं लागेल. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यास विलंब होत आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सॅनिटायझेशनच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?

सध्या दररोज लोकल ट्रेन सॅनिटाइझ केल्या जात आहे. लोकल ट्रेन सॅनिटाइझ करणं हे किती मोठं काम आहे हे लक्षात घेतलं तर प्रत्येक फेरीनंतर लोकल ट्रेनचं सॅनिटायजेशन करणं शक्य नाही. परंतु दररोज हे काम केलं जात आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai local