Home /News /mumbai /

..तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

..तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

हनुमान चालिसा पठणाने कोरोना जाईल हे खरे असेल तर हनुमान चालिसा पठणाने रोजगार गमावलेल्या 10 कोटी लोकांना जगण्यापुरते तरी काम मिळेल काय?

    मुंबई, 02 ऑगस्ट : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.  पण 'कोरोनाच्या संकटावर कुणी बोलत नाही. भूक, बेरोजगारीवर कुणी तळमळ व्यक्त करताना दिसत नाही.' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'असंच चालू राहिले तर लोकं रस्त्यावर उतरतील आणि पंतप्रधानांचा राजीनामा मागतील' अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. 'कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या देशात 10 कोटी लोक रोजगार गमावणार आहेत. हा वरवरचा आकडा आहे. ‘कोरोना मंदी’मुळे किमान 40 कोटी कुटुंबांच्या उपजीविकेवर आक्रमण होईल असा माझा अंदाज आहे. चार लाख कोटींचा फटका व्यापार उद्योगास बसला आहे. त्यात लहान व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात आहेत. लोकांच्या संयमालाही मर्यादा आहेत. नुसत्या आशेवर आणि आश्वासनांवर लोकांनी कुठवर दम काढायचा? गेल्या पंधरा वर्षांत लोकांची एकही अडचण दूर झाली नाही. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे पंतप्रधान मोदी यांचे मित्र आहेत. आर्थिक डबघाई आणि कोरोनासंदर्भातले अपयश यामुळे संतापलेल्या इस्रायली जनतेने जागोजागी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. इस्रायलची जनता पंतप्रधान नेतान्याहू यांचा राजीनामा मागत आहे. ही वेळ हिंदुस्थानवरही येऊ शकते' असं म्हणत राऊत यांनी पंतप्रधान मोदींना सल्लावजा टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंची सांत्वन भेट तसंच, भारतात कोरोनाचे संकट भयंकर आहे. त्यावर ‘मात’ करण्यासाठी सरकारी पातळीवर काय केले तर 'क्षेपणास्त्र, घातक बॉम्ब यांनी भरलेली पाच फायटर जेट राफेल भारतात पोहोचली. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर त्यांचे आगमन झाले व या विमानांच्या सुरक्षेसाठी आसपासच्या परिसरात 144 कलम लागू केले आहे. राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करून काँगेसचे गेहलोत यांचे सरकार अडचणीत आणले. तेथे आता राष्ट्रपती राजवट लावली जाईल असे वातावरण दिसते.  भाजपच्या एक नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले, रोज एकाग्रतेने हनुमान चालिसा पठण केल्याने कोरोनासह सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. (40 कोटी लोकांनी रोजगार गमावला. त्यांना काम मिळेल काय?) आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले, आता महाराष्ट्रात स्वबळावरच सत्ता आणू' असं काही करण्यात आले आहे. पण संकटावर कुणी बोलत नाही. भूक, बेरोजगारीवर कुणी तळमळ व्यक्त करताना दिसत नाही. ‘संकट हीच संधी’ अशी वाक्ये तोंडावर फेकणे सोपे आहे, पण लोक संकटाशी कसे मुकाबला करीत आहेत हे कुणालाच माहीत नाही' असं म्हणत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. ब्लॅक पँथरच्या VIRAL फोटोमागची कहाणी, 2 तासाची प्रतीक्षा आणि 20 मिनिटांची भेट 'लाखो नव्हे, कोट्यवधी लोकं आज बेकार होऊन घरी बसले आहेत. आभाळाला अनेक भोके पडली आहेत. अनेक धंदे बंद पडले आहेत. दुकानाला टाळी लागली आहेत. उद्योगांचे दिवाळे वाजले आहे. शिक्षण बंद पडले आहे. नोकरकपात आहेच, पण नोकर्‍या आहेत त्यांची पगारकपात झाली आहे. महागाई, गरिबी आणि बेकारी यांचे असंख्य वणवे समाजात भडकले आहेत. कोविडचे युद्ध हे रणांगण आहेच. या रणांगणात सरकार उतरलेच आहे. रणांगणाच्या आघाडीपेक्षाही आर्थिक आघाडी महत्त्वाची आहे. जे प्राण कोविडच्या रणांगणात वाचवले, ते प्राण आर्थिक आघाडीवर गमावले तर नक्की कमावले काय, हा प्रश्नच राहील. हनुमान चालिसा पठणाने कोरोना जाईल हे खरे असेल तर हनुमान चालिसा पठणाने रोजगार गमावलेल्या 10 कोटी लोकांना जगण्यापुरते तरी काम मिळेल काय?' असा रोखठोक सवाल राऊत यांनी भाजपला विचारला आहे. पाच राफेल लढाऊ जेट विमाने अंबाला एअरफोर्स स्टेशनवर उतरली. हे चांगलेच झाले. पण याआधीही सुखोईपासून मिगपर्यंत अनेक फायटर जेट विमाने परदेशातून आपण येथे आणलीच आहेत. त्यांचा हा असा इतका उत्सव कधी झाला नव्हता. सुखोई, मिगनेही दुश्मनांवर हवाई हल्ले करून विजय मिळवलेच आहेत. पण लोकांना उत्सवाची, जत्रांची भांग पाजून मूळ प्रश्नांपासून दूर न्यायचे धोरण सुरू आहे. बॉम्ब आणि क्षेपणास्त्रवाहक राफेल विमाने देशासमोरच्या बेरोजगारी व आर्थिक आव्हानांचा विध्वंस करतील काय? असाही सवाल राऊत यांनी मोदींना विचारला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या