Home /News /mumbai /

सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी, मुंबईत बरा झालेल्या व्यक्तिची काढली मिरवणूक

सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी, मुंबईत बरा झालेल्या व्यक्तिची काढली मिरवणूक

अशा अतिउत्साहामुळे नव्या संकटाला आमंत्रण मिळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई 22 एप्रिल: सगळ्या देशातच मुंबई हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन सरकारपासून सगळेच करत आहेत. मात्र कोरोनामुक्त झालेल्या एका व्यक्तिची तो परत आल्यावर स्थानिकांनी मिरवणूकच काढली आणि सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केली. अशा प्रकारामुळे सरकारचे प्रयत्न वाया जाण्याची शक्यता आहे. कुर्ला पूर्वेला असलेल्या नेहरूनगरमधल्या एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर तो बरा झाला. त्यानंतर तो जेव्हा घरी आला तेव्हा स्थानिक लोकांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं आणि मिरवणूकच काढली. त्या व्यक्तिच्या स्वागतासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. अरुंद गल्ल्या दाटीवाटीत असलेली घरं यामुळे आधीच या भागात कोरोनाचा प्रसार होत आहे. सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. त्यामुळे उत्साहाच्या भरात होणारी गर्दीही घातक ठरू शकते. अशा अतिउत्साहामुळे नव्या संकटाला आमंत्रण मिळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य मंत्र्यांकडून दिलासादायक माहिती देशात कोरोनाचा प्रसार वाढतोच आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 486 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 471 एवढी झाली आहे. तर 24 तासांमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या 652 झाली आहे. करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. 3 मेरोजी देशभरातला लॉकडाऊन संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती काय असेल यावर या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावलं उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.

मानलंच पाहिजे! ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी बिल गेट्स यांनी केलं मोदींचं कौतुक

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या