आरजे मलिष्काच्या समर्थनार्थ मुंबईकरांनी काढला मोर्चा

मलिष्कावर टीका करण्यापेक्षा आणि तिला दंड करण्यापेक्षा रस्त्यांची परिस्थिती सुधारा. शहरात हजारो खड्डे पडलेत, त्याचं बीएमसी आणि शिवसेनेला काहीही पडलेली नाही, असा राग मुंबईकरांनी बोलून दाखवला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2017 08:37 PM IST

आरजे मलिष्काच्या समर्थनार्थ मुंबईकरांनी काढला मोर्चा

22 जुलै : मुंबईत आज काही नागरिकांनी आरजे मलिष्काच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. बीएमसीवर यावेळी नागरिकांनी राग व्यक्त केला.

मलिष्कावर टीका करण्यापेक्षा आणि तिला दंड करण्यापेक्षा रस्त्यांची परिस्थिती सुधारा. शहरात हजारो खड्डे पडलेत, त्याचं बीएमसी आणि शिवसेनेला काहीही पडलेली नाही, असा राग मुंबईकरांनी बोलून दाखवला.

मलिष्कानं बीएमसीवर केलेलं गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं होतं. नंतर पालिकेनं मलिष्काच्या घरी जाऊन डेंग्युच्या अळ्या असल्याचा शोध लावला. त्यावर बरीच टीका झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2017 08:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...