मुंबई, 17 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे उत्तराखंडमधील कुंभमेळा अखेर संपवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा असं म्हटलं आहे. मात्र आता कुंभमेळ्यांतून पुन्हा त्यांच्या राज्यांत परतणारे भाविक कोरोनाचा संसर्ग पसरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या महापौर यांनीदेखिल या मुद्द्यावरून टीका केल्याचं पाहायला मिळालं. आता परतणाऱ्यांसंदर्भात अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
(वाचा - मुंबई संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने! कोरोना स्थिती पाहाता महापौरांनी दिले संकेत)
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरून अत्यंत परखडपणे त्यांचं मत मांडलं आहे. गेल्यावर्षी 27 मुस्लीम बांधव मरकजहून परतल्यानंतर कोरोनाचा प्रसार झाला होता. त्याचप्रकारे आता कुंभमेळ्यातून परतणारे भाविक इतरांना कोरोनाचा प्रसाद वाटत फिरतील असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. प्रत्येक राज्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी केलंलं ट्वीट योग्य आहे. नक्कीच कुंभमेळा बंद व्हायला हवा पण आता उशीर झाला आहे. आता संसंर्ग रोखायचा असेल तर, परतणारे भाविक ज्या राज्यांत जातील तिथं त्यांना स्वखर्चानं क्वारंटाईन करायला लावावं असंही पेडणेकर यांनी म्हटलंय.
तसंच या सर्वांची कोरोना चाचणी करून खबरदारी घ्यावी लागणार असल्याचंही त्या म्हणाल्या. मुंबईतही अशाप्रकारचा निर्णय घेण्याचा विचार असल्याचं त्या म्हणाल्या. प्रत्येक एसटी डेपोमध्ये परणाऱ्यांची तिकिटे पाहून कुंभमेळ्यातून आलेले असल्यास त्यांना क्वारंटाईन करणार असल्याचं ते म्हणाले.
#WATCH | "Those returning from Kumbh Mela to their respective states will distribute Corona as 'prasad'," says Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/P9UBVBv1mN
— ANI (@ANI) April 17, 2021
भक्ती असायलाच हवी, मात्र सध्याची वेळ ही तुमच्या अंतर्गत शक्तीची वेळ आहे. त्यामुळं सर्वांनी खबरदारी घ्यावी. जो कोणी ट्रेस होईल त्याला क्वारंटाईन करावंच लागेल असंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच ट्वीट करत साधुंशी बोलणं झाल्याची माहिती दिली होती. साधुंनी घेतलेल्या कुंभमेळा बंद करण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. तसंच कुंभमेळा प्रतिकात्मकच ठेवावा असंही म्हटलं होते. त्यानंतर आता कुंभमेळ्यातून भाविक त्यांच्या राज्यात परतणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांनी हे मत व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kishori pedanekar, Kumbh mela, Mumbai News