मोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. सत्तेत सहभागी असेल्या शिवसेनेनं भाजपला टोला लगावण्याची संधी सोडली नाही.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 06:37 PM IST

मोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम


11 डिसेंबर : मोदी यांच्या हिटलरशाहीला, नोटबंदीसारख्या निर्णयाला आणि 15 लाख रुपये खात्यात जमा होणार अशा चुनावी जुमल्यासारख्या निर्णयाला जनतेनं साफ नाकारले आहे अशी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली.

पाच राज्यांच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. सत्तेत सहभागी असेल्या शिवसेनेनं भाजपला टोला लगावण्याची संधी सोडली नाही.

जे नको ते मतदारांनी नाकारलं आहे. त्यासाठी सगळ्या मतदारांचे आभार अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती. पर्याय कोण या फालतू प्रश्नात गुंतून न पडता 4 राज्यांच्या मतदारांनी जे धाडस दाखवलं, त्यांच्या या बेडरपणाचं मी अभिनंदन करतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तर सेनेचे रामदास कदम यांनीही भाजपवर टीका केली. मोदी यांच्या हिटलरशाहीला, नोटबंदीसारख्या निर्णयाला जिथे रांगेत उभं राहुन अनेक लोकं मृत्युमुखी पडले, 15 लाख रुपये खात्यात जमा होणार अशा चुनावी जुमल्यासारख्या निर्णयाला जनतेनं साफ नाकारले आहे अशी टीका कदम यांनी केली.

Loading...

शिवसेना काल मोठा भाऊ होता आणि मग भाजपाला स्वतःला मोठा भाऊ समजायला लागला, चुकीची वागणूक देऊ लागला होता. आता तरी भाजपचे पाय जमिनीवर येतील, मित्र पक्षाला मान देतील अशी अपेक्षा आहे असा टोलाही कदम यांनी लगावला.

दरम्यान, राज्यात दूध उत्पादक आणि विक्रेते यांच्याबरोबर बैठक झाली, त्यांच्या मनात असलेले प्रश्न दूर झाले आहेत. प्लास्टिक पिशवीवर बंदी आणलेली नाही हे पुन्हा एकदा सांगितलं आहे, मात्र ही पिशवी रस्त्यावर येणार नाही याबाबत खबरदारी विक्रेते -उत्पादक यांनी घ्यायची आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधी दिला आहे अशी माहितीही कदम यांनी दिली.


=====================बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...