News18 Lokmat

राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

भाजपमधील निष्ठावान आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2017 10:48 AM IST

राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

मुंबई, 05 ऑक्टोबर: राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपमधील निष्ठावान आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला आहे.

भाजपात ज्यांची 3 री आणि 4 थी टर्म आहे ते आमदार यामुळे अस्वस्थ झाले आहेत. यात 7 प्रदीर्घ अनुभवी आमदार आहेत. तर काँग्रेस आणि एनसीपी मधून भाजपत आलेले आमदारही अस्वस्थ आहे. यात 15 दिग्गज आमदार आणि 4 माजी मंत्री देखील आहेत. जर शिवसेनेला टक्करच द्यायची असेल तर आशिष शेलार, अनिल गोटे का नको असाही प्रश्नही विचारला जातोय.

दरम्यान विस्तारात पंकजा मुंडे, बावनकुळे,गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश बापट यांच्यापैकी कुणाचं खातं कमी होणार ही भीतीही मंत्र्यांना सतावते आहे. पण सर्वांनी नो कॉमेंट्स अशी भूमिका घेतली आहे. या 10 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2017 10:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...