लालबागाच्या राजाच्या दारातही 'बनवेगिरी' ! सव्वा लाखाच्या जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या

या नोटांची एकूण किंमत १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2017 03:33 PM IST

लालबागाच्या राजाच्या दारातही 'बनवेगिरी' ! सव्वा लाखाच्या जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या

मुंबई, 09 ऑगस्ट: यंदा गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दान पेटीत काही भाविकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जून्या नोटा दान केल्या आहेत. त्यांची एकूण किंमत १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दिलेल्या मुदती नंतरही, ज्यांनी नोटा बदलून घेतल्या नाहीत अशा नागरीकांनी आता आपल्या जवळील जुन्या नोटा अखेर बाप्पांच्या दानपेटीत जमा केल्या आहेत. या जून्या नोटांसंदर्भात लालबागचा राजा मंडळ बँक ऑफ महाराष्ट्रशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र लालबागच्या राजाच्या दान पेटीत जमा झालेल्या दानाची मोजदात करते.

दरम्यान गणेशोत्सवाच्या 10 दिवसात जमा झालेल्या सोन्या चांदीचा मंडळ आज संध्याकाळी लिलाव करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...