पत्नीने केली आत्महत्या, 8 तास मृतदेह गाडीत घेऊन फिरत होता पती

पत्नीने केली आत्महत्या, 8 तास मृतदेह गाडीत घेऊन फिरत होता पती

मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका 28 वर्षीय व्यक्तीला आपल्या पत्नीचा खून केल्या प्रकरणी दोषी ठरवत अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका 28 वर्षीय व्यक्तीला आपल्या पत्नीचा खून केल्या प्रकरणी दोषी ठरवत अटक केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी त्याच्या पत्नीचा मृतदेह किमान आठ तास आपल्या गाडीत घेऊन मुंबईभर फिरत होता.

ही घटना 6 जूनची आहे जेव्हा अंधेरी इस्टमध्ये राहणाऱ्या सोकलाराम पुरोहित 1:30 वाजता त्याच्या घरी पोहचले. तेव्हा त्यांनी दरवाजा उघडताच पाहिलं की त्यांच्या पत्नीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. सोकलाराम यांनी ताबडतोब त्यांच्या पत्नीला रुग्णालयात घेऊन गेले पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

त्यानंतर डॉक्टरांनी पोस्टमॉर्टमसाठी त्यांच्या पत्नीचा मृतदेह सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितला. पण पत्नी जाण्याच्या धक्क्यात असलेल्या सोकलाराम यांनी पुन्हा तपासणीसाठी त्यांच्या पत्नीला आणखी एका रुग्णालयात नेलं. पण तितेही त्यांना मृत सांगण्यात आलं.

औरंगाबादमधले नाले अजूनही उघडेच, पाण्याच्या लोंढ्यात बुलेटही गेली वाहून, चालकाचा मृत्यू

मृत पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोकलाराम बोरीवलीच्या दिशेने जात होते, पण त्यांनी अचानक गाडी फिरवली आणि कांदीवलीच्या शताब्दी रुग्णालयात गेले. आणि तितेही आपली पत्नी जिंवत आहे का याची तपासणी त्यांनी केली.

पण दरम्यान, डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवलं. सुरुवातीला अपघाती मृत्यू झाल्याची पोलिसांनी नोंद केली. पण सोकलाराम हे त्यांच्या पत्नीपासून नाखूशहोते, कारण त्या आई होऊ शकत नव्हत्या अशी माहिती पुढे तपासाअंतर्गत समोर आली.

त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोकलाराम यांच्यावर लावण्यात आला. पण पत्नी जाण्याच्या धक्क्यात तब्बल 8 तास सोकलाराम त्यांच्या पत्नीचा मृतदेह कारमध्ये घेऊन फिरत असल्यामुळे परिसरात अद्यापही खळबळ माजली आहे.

 

हेही वाचा...

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

आफ्रिकेत एड्स कार्यकर्त्यांनी औषधांबदल्यात ठेवले शरीर संबंध, वेश्यांचा केला वापर

First published: June 22, 2018, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading