इतर राज्यातून येणारी लोकं मुंबईला महान बनवतात-मुख्यमंत्री

इतर राज्यातून येणारी लोकं मुंबईला महान बनवतात-मुख्यमंत्री

"मुंबईतील उत्तर भारतीय तसंच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात"

  • Share this:

30 नोव्हेंबर : मुंबईतील उत्तर भारतीय तसंच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला आहे असं कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

हिंदी विद्या प्रचार समितीतर्फे घाटकोपरमध्ये तयार करण्यात आलेल्या शिक्षण महर्षी श्री आई डी सिंह यांच्या नावाच्या चौकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचं कौतुक केलं.  भाषा हे संपर्काचे साधन आहे, ते विवादाचे माध्यम नाही. हा वाद निर्माण करणे चुकीचे आहे. उत्तर भारतीय तसंच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच मतांच्या राजकारणासाठी कुणीही भाषिक वाद करू नये असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला.  आता यावर मनसे काय प्रतिक्रिया देते ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 01:04 PM IST

ताज्या बातम्या