News18 Lokmat

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत येतात. यावर्षी मात्र पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आसपासच्या ३५हून अधिक शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2017 08:49 AM IST

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी

06 डिसेंबर,मुंबई :  आज महापरिनिर्वाण दिन.  6 डिसेंबर 1956 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला.  मुंबईतल्या चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत येतात. यावर्षी मात्र पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आसपासच्या ३५हून अधिक शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

ओखी वादळामुळं झालेल्या पावसाचा चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनासाठी आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांना मोठा फटका बसला आहे. आडोशासाठी शिवाजीपार्कात उभारण्यात आलेला मंडप रात्री आठच्या सुमारास कोसळला. यात तीन जण जखमी झाले. त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कोसळलेल्या मंडपाखाली अनेकजण अडकले होते. पण फायरब्रिगेडच्या जवानांनी तातडीनं धाव घेत मंडपाखाली अडकलेल्या लोकांची सुटका केली. पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राज्य सरकार भीम अनुयायांना सोईसुविधा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी अनुयायांनी केला. यावेळी उपस्थित लोकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 08:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...