Home /News /mumbai /

वृद्ध रेल्वे रुळ ओलांडतानाच आली ट्रेन, दैव बलवत्तर म्हणून असे बचावले; पाहा VIDEO

वृद्ध रेल्वे रुळ ओलांडतानाच आली ट्रेन, दैव बलवत्तर म्हणून असे बचावले; पाहा VIDEO

मुंबईमध्ये प्रत्येकालाच घाई असते. त्यासाठी सगळेच धावपळ करत असतात. मात्र लोकल प्रवासात अतीघाई आपल्या जीवावरही बेतू शकते.

    मुंबई, 16 फेब्रुवारी - मुंबई...सतत धावणारं कधीही न झोपणारं आणि घड्याळाच्या काट्यावर वेग असणारं शहर अशी या स्वप्ननगरीची ओळख आहे. हीच नाही तर अशी असंख्य विशेषणं या मुंबापुरीला दिला जातात. आणि या मुंबईकरांचा वेग अवलंबून आहे तो मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवर. मुंबईचा वेग लोकलवर अवलंबून आहे. मुंबईकरांचा दिवस सुरू होतो तो लोकलच्या धडधडीने आणि त्यांचा दिवस संपतोही या लोकलच्या धडधडीने. मात्र घडाळाच्या काट्यावर पळापळ करणारे मुंबईकर नेहमीच घाईत काही चुका करतात. तरी कधी नियमही मोडतात. आणि चुका अनेकदा त्यांच्या जीवावरही बेततात. असाच एक मुंबईच्या भायखळा स्टेशनवरचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध रेल्वे रुळ ओलंडत असताना अचानक त्याच ट्रॅकवरून लोकल आली. तिकडून लोकल आलेली पाहिली आणि त्या वृध्दाच्याही काळजात धस्स झालं आणि स्टेशनवर उपस्थित असलेल्या सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. कारण काही क्षणांचा विलंब या वृद्धाच्या जिवावर बेतला असता. मात्र इथं देवदूत बनला तो मोटरमन, स्टेशनवर उपस्थित सुरक्षा रक्षक आणि प्रवासी सुद्धा. कारण या वृद्धाला वाचवण्यासाठी एकीकडे सुरक्षा रक्षक आणि काही प्रवासी सरसावले तर तिकडे मोटरमननेही प्रसंगावधान राखत लोकल थांबवली. आणि स्टेशनवर उपस्थित असलेल्या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. तर असाच काहीसा प्रकार ओडिशाच्या भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर घडलाय. भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर एक तरुणी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या डब्याच्या मधल्या गॅपमध्ये पडली. आणि रेल्वेने वेगही घेतला होता. तेव्हढ्यात तीथे तैनात असलेला RPF चा जवान धावला आणि त्यांने तातडीने या मुलीच्या या गॅपमधून बाहेर काढलं. एव्हाना ती रेल्वे मोठ्या वेगात तिथून निघूनही गेली. थोडासा जरी उशिर झाला असता तर त्या मुलीच्या जिवावर बेतलं असतं. त्यामुळे अति घाई संकटात नेई असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. प्रत्येकाला वेळ साधायची असते. महत्वाची अतिमहत्वाची कामं असतात हे सगळं जरी खरं असलं तरी आयुष्यात आपल्या जीवापेक्षा काय महत्वाचं आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विरारायला हवा.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Indian railway, Mumbai local

    पुढील बातम्या