'पेंग्विन'ने मुंबई पालिकेचं नाव काढलं, आतापर्यंत 11 लाखांची कमाई

'पेंग्विन'ने मुंबई पालिकेचं नाव काढलं, आतापर्यंत 11 लाखांची कमाई

इतक्या वर्षात राणीच्या बागेत कधीच इतकी गर्दी झाल्याचं चित्र नव्हतं. मात्र पेंग्विन दर्शनामुळे गर्दीचा उच्चांक मोडला गेला

  • Share this:

08 एप्रिल : मुंबई महापालिकेला आणि राणीबागेला पेंग्विनमुळे अच्छे दिन आल्याचं चित्र आहे. कारण पालिकेच्या तिजोरीत 16 दिवसात 11 लाख 16 हजार 22 रूपये जमा झाले आहेत.

कोट्यवधीचे पेंग्विन आणल्यावरुन एकच राजकीय राडा पाहण्यास मिळाला होता. हे पेंग्विन दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील कोएक्स अॅक्वेरिअममधून आणण्यात आले होते. यापैकी एका पेंग्विनचा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला. या प्रकल्पासाठी 20 कोटी खर्च करण्यात आले होते. पण या वादानंतरही अखेरीस पेंग्विन प्रकल्प सुरूच करण्यात आला. अल्पावधीत या प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद मिळाला. या पेंग्विनला पाहण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केलीये.

इतक्या वर्षात राणीच्या बागेत कधीच इतकी गर्दी झाल्याचं चित्र नव्हतं. मात्र पेंग्विन दर्शनामुळे गर्दीचा उच्चांक मोडला गेलाय.

मार्च महिन्यात 2 लाख 27 हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली आहे. तर सध्या पेंग्विन पाहण्यासाठीचे लहान मुलांचे दर 2 रूपये आणि प्रौढांसाठी 5 रूपये आहेत मात्र पेंग्विन प्रकल्पाला तडे गेल्यानं पुढे काय होणार ? हा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 06:49 PM IST

ताज्या बातम्या