S M L

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू, अवघे सात दिवस जगले पिल्लू

पेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूचं कारण डाॅक्टरांनी पिल्लात जन्मजात निर्माण झालेल्या आरोग्य विषयी त्रुटीमुळे झाल्याचं सांगण्यात येतंय.

Updated On: Aug 24, 2018 06:04 PM IST

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू, अवघे सात दिवस जगले पिल्लू

मुंबई, 23 आॅगस्ट : राणीच्या बागेत दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर पाळणा हलला आणि बेबी पेंग्विनचा जन्म झाला पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अवघे काही दिवसच या पिल्लाने जग पाहिले. 22 आॅगस्टच्या रात्री या पिल्लाचा मृत्यू झाला.  १५ आॅगस्टला रात्री जन्मलेल्या या पिल्लाचं आयुष्य अवघं ७ दिवसाचंच राहीलं.

मोल्ट आणि फिलिप्स या नर-मादी पेग्विनंचं हे पिल्लू जन्मलं तेव्हा सर्व मुंबईकरांना आनंद झाला होता. या नव्या मुंबईकर पाहुण्याचं स्वागत करणारे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते.

मात्र २२ आॅगस्टला या नवजात पिल्लाचा मृत्यू झाल्याचं पालिका प्रशासनाने सांगितलंय.

पेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूचं कारण डाॅक्टरांनी पिल्लात जन्मजात निर्माण झालेल्या आरोग्य विषयी त्रुटीमुळे झाल्याचं सांगण्यात येतंय. पण या छोट्या मुंबईकर पाहुण्याच्या अकाली जाण्याने मुंबईकर मात्र हेलावून गेले आहे.

भारतात पेग्विंनचा जन्म होण्याची घटना पहिलीच असल्यामुळे डॉक्टर सतत अमेरिकेतील तज्ज्ञांच्या संपर्कात होते. पिल्लाच्या जन्मानंतर आई- वडिलांच्या स्वभावात खूप बदल होतात. त्यांच्यातील बदलांना योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर सातत्याने अमेरिकेतील तज्ज्ञांच्या संपर्कात होते.बंदिस्त वातावरणात जन्माला येणारे हे देशातील पहिले पेंग्विन होते.

Loading...
Loading...

नामकरण सोहळा  राहिला

दरम्यान, बेबी पेंग्विनचे नाव मीच ठेवणार असा हट्ट मिष्का मंगुर्डेकर या सहा वर्षाच्या मुलीने धरला होता. मिष्का जुहू येथील बेसंट मॉन्टेसरी शाळेत पहिल्या वर्षात शिकते. मिष्काने राणी बाग प्रशासनाकडे बेबी पेंग्विनच्या नावांची आकर्षक यादीच पाठवली होती. पिल्लू जर नर असेल तर त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह तिने धरला होता. या हम्बोल्ट पेंग्विनची चांगली गोष्ट म्हणजे मिस्टर मोल्ड हा प्लिपरपेक्षा लहान असून राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनपैकी या जोडीला सर्वात पौढ जोडी मानली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2018 06:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close