मनसेची फेरीवाला हटाव मोहीम अधिक तीव्र

मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरुद्धची मोहीम आणखीनच तीव्र केली आहे. काल रात्री शिवडी, लालबाग, परळ, या भागातील फेरीवाल्यांना मनसैनिकांनी बळजबरीने उठवलं.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2017 10:30 AM IST

मनसेची फेरीवाला हटाव मोहीम अधिक तीव्र

मुंबई, 30 ऑक्टोबर: मनसेची फेरीवाला हटान मोहीम अधिकच तीव्र करण्यात आली आहे.काल रात्री देखील ठिकठिकाणच्या फेरीवाल्यांना मनसेने हटवले.

मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरुद्धची मोहीम आणखीनच तीव्र केली आहे. काल रात्री शिवडी, लालबाग, परळ, या भागातील फेरीवाल्यांना मनसैनिकांनी बळजबरीने उठवलं. आणि उद्यापासून धंदा लावायचा नाही असा दम दिला. अनेक दिवसांपासून दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या ठिकाणी मनसेची कारवाई सुरू आहे. दरम्यान काही फेरीवाल्यांनी देखील मनसैनिकाला मारहाण केली होती. त्यावर सगळीकडूनच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कल्याण डोंबिवली,ठाणे इथूनही फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे.पण मनसैनिक गेल्यावर फेरीवाल्यांनी पुन्हा तिथे ठाण मांडले. काल मध्य मुंबईतही फेरीवाल्यांना उठवण्यात आलं.

आता फेरीवाल्यांच्या बाबतीत प्रशासन काही योग्य निर्णय घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...