पायल तडवीच्या मोबाइलमध्ये सापडली आरोपींनी डिलीट केलेली सुसाइड नोट

पायल तडवीच्या मोबाइलमध्ये सापडली आरोपींनी डिलीट केलेली सुसाइड नोट

मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पायल तड़वीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली होती. आता तर पायलच्या मोबाइलमध्ये तिची सुसाइड नोट मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक खळबळजनक खुलासा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पायल तड़वीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली होती. आता तर पायलच्या मोबाइलमध्ये तिची सुसाइड नोट मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक खळबळजनक खुलासा झाला आहे.

पायलच्या मोबाइलमध्ये तिने तिच्या सुसाइड नोटचा काढलेला फोटो मिळाला. यामध्ये तिने तिच्या आत्महत्येबद्दल तिन्ही महिला डॉक्टरांना जबाबदार धरलं आहे. या डॉक्टर जेव्हा पायलच्या आत्महत्येनंतर तिच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांनी तिच्या मोबाइल फोनमधली सुसाइड नोट डिलिट केली होती.

चिखलफेक' नितेश राणेंचा जामीन फेटाळला, 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

फोरेन्सिक तज्ज्ञांनी पायलच्या फोनमधल्या या फाइल रिकव्हर केल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँचने केलेल्या तपासानुसार, पायलने या सुसाइड नोटमध्ये डॉक्टर हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल या तिन्ही डॉक्टरांना जबाबदार धरलं होतं.

या डॉक्टर पायलची तिच्या जातीवरून हेटाळणी करत होत्या. या छळाला कंटाळून पायलने आत्महत्या केली होती.

आता मोबाइलमध्ये मिळालेल्या फाईल्सनंतर या प्रकरणी खटला दाखल करून घेण्यात आणि आरोपींना अटक करण्यात ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होते आहे.

सायन हॉस्पिटलमधल्या डॉक्टर हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल या डॉक्टर्स पायलचा छळ करत होत्या. ती अनुसूचित जाती-जमातीतली असल्याने त्या तिला सतत टोमणे मारायच्या. या छळामुळे पायलने 22 मे ला पायलने आत्महत्या केली होती. तिच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मात्र तिच्या गळ्याला जखमा झाल्याचंही समोर आलं होतं.

=============================================================================================

गाडी उलटून सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO समोर

First published: July 5, 2019, 8:48 PM IST

ताज्या बातम्या