विनाकारण हाॅर्न वाजवला तर भरावा लागेल 2 हजारांचा दंड !

विनाकारण हाॅर्न वाजवला तर भरावा लागेल 2 हजारांचा दंड !

यापुढे विनाकारण आणि शांतता क्षेत्रात गाड्यांचे हाॅर्न वाजवल्यास २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात दिली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

29 जून : यापुढे विनाकारण आणि शांतता क्षेत्रात गाड्यांचे हाॅर्न वाजवल्यास २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात दिली आहे.

महाराष्ट्र वाहतूक आणि रस्ते सुरक्षा कायदा २०१७ ला राष्ट्रपतींच्या मंजुरीची राज्य सरकार वाट पाहत असून, मंजुरीनंतर दंड आकारण्यात येईल अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली आहे.

या कायद्याच्या कलम २० अन्वये विनाकारण हाॅर्न वाजवणे आणि शांतता क्षेत्रात हाॅर्न वाचवणे यास मनाई केली आहे. तर कलम २३ अन्वये रुपये दोन हजारांच्या दंडाची तरतूद केली आहे. या कायदा या वर्षी एप्रिलमध्ये राज्य विधिमंडळात पास झाला आहे.

ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील दहा शहरांमध्ये नाॅईज मॅपिंग करण्यात येणार असल्याचीही माहिती सरकारच्या वतीनं कोर्टाला देण्यात आली आहे.

ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचं होण्याबद्दल आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली, ठाण्यात याच विषयावर लढा देणारे महेश बेडेकर यांच्यासह इतर काही जणांनी दाखल केलेल्या याचिकांवर एकत्रितपणे झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading